नाले सफाई तूर्त विनानिविदा होणार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 एप्रिल 2017

सांगली - नाले सफाईची निविदाप्रक्रिया पूर्ण होईपर्यंत पूर्वीच्याच ठेकेदारातर्फे काम सुरू ठेवण्याचा निर्णय आज स्थायी समितीच्या बैठकीत झाला. सभापती संगीता हारगे यांनी आज बैठकीच्या अजेंड्यावरील या विषयाबाबत निर्णय देताना पावसाळ्याआधी नाले सफाईची कामे व्हायची असतील तर विलंब लागू नये, या हेतूने हा निर्णय घेतल्याचे सांगितले.

पावसाळ्यात आवश्‍यकतेप्रमाणे पोकलॅन, बॅक हो लोडर मशीन, डंपर भाड्याने घेणे व भाड्याचा वार्षिक दर निश्‍चित करण्यासाठी प्रभागनिहाय निविदा दर मागवण्यासाठी ३४ लाख ३९ हजार रुपयांची खर्चाची तरतूद करण्यात आली. या कामासाठीची निविदाप्रक्रिया सध्या राबवण्यात येत आहे. मात्र त्याआधीच आधीच्या ठेकेदाराला कामे करण्यास स्थायीने संमती दिली. लिंगायत, ख्रिश्‍चन, मुस्लिम समाजातील मृतांच्या अंत्यसंस्कारासाठी साहित्य पुरवण्यासाठी वार्षिक ठेकेदार ठरवण्यासाठी निविदाप्रक्रिया राबवण्यात येत आहे. या कामी १४ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली.

मिरजेतील डिझेल दाहिनीसाठी ७.७५ लाख रुपयांच्या निविदा मागवण्यात आली. माळ बंगला जलशुद्धीकरण केंद्राच्या पाइपलाइन्स रेल्वे ट्रॅक पार करून नेण्यासाठीच्या श्रीराम ड्रिलिंग कंपनीच्या २४.३५ लाख व २३.९३ लाख रुपये किमतीच्या कामांना आज मंजुरी देण्यात आली. आजच्या बैठकीत माधवनगर रस्त्यावर मदन पाटील स्मृती उद्यानाच्या कुंपण भिंत बांधकामाची २७.८४ लाख रुपयांच्या निविदेस आज मंजुरी देण्यात आली. मिरजेतील लोंढे कॉलनीतील विहिरीचे पुनरुज्जीवनासाठी १० लाखांच्या निविदेला, पावणेदोन लाखांच्या हार पुष्पगुच्छ वार्षिक खरेदीची निविदेस मंजुरी मिळाली. बगीचांमधील कूपनलिकांच्या वीज मोटारींची देखभालसाठीच्या वार्षिक १.९८ लाखांच्या एजन्सीची निविदा जाहीर करण्यात आली.

Web Title: dranga cleaning without tender