ज्येष्ठ विचारवंत डॉ. कृष्णा किरवले यांची कोल्हापुरात हत्या

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 मार्च 2017

कोल्हापूर : आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ विचारवंत अशी ओळख असलेले डॉ. कृष्णा किरवले यांची आज (शुक्रवार) कोल्हापुरातील राजेंद्रनगर येथील त्यांच्या राहत्या घरी हत्या झाली.

डॉ. कृष्णा किरवले कोल्हापुरातील राजेंद्रनगर परिसरात असलेल्या म्हाडा कॉलनीत राहत होते. कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येनंतर पुन्हा एका विचारवंताची हत्या झाल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. 

घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून या प्रकरणाचा तपास करत आहेत. हत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी प्राथमिक माहितीनुसार आर्थिक देवघेवीसारख्या व्यक्तीगत कारणातून हे कृत्य झाल्याचा संशय आहे.

डॉ. कृष्णा किरवले शिवाजी विद्यापिठातील मराठी विभागाचे माजी विभाग प्रमुख होते. डॉ. किरवले यांनी आपल्या लिखाणातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार देशभरात पोचवले होते.
 
Web Title: Dr.Krishna Kiravale Murder at Kolhapur