निलंगा येथे १२ डिसेंबरला शेतकरी संघटनेची दुष्काळी परिषद

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 डिसेंबर 2018

सांगली - मराठवाड्यातील निलंगा येथे १२ डिसेंबरला रघुनाथ पाटील यांच्या नेतृत्त्वात दुष्काळी परिषद आयोजित केली आहे. या परिषदेच्या प्रचारासाठी सहा डिसेंबरपासून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राज्यभर यात्रा निघणार आहे. ​

सांगली - मराठवाड्यातील निलंगा येथे १२ डिसेंबरला रघुनाथ पाटील यांच्या नेतृत्त्वात दुष्काळी परिषद आयोजित केली आहे. या परिषदेच्या प्रचारासाठी सहा डिसेंबरपासून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राज्यभर यात्रा निघणार आहे. 

शेतकरी आत्महत्या, शेतकऱ्यांना भेडसावणारे प्रश्न, गोवंश हत्याबंदी यासारख्या अनेक प्रश्नांवर आवाज उठवण्यासाठी रघुनाथ पाटील प्रणित शेतकरी संघटना सरकारविरोधात राज्याच्या वेगवेगळ्या भागात सभा घेणार आहे.  

सहा डिसेंबरपासून पश्चिम महाराष्ट्रातून या सभांना सुरूवात होईल. याचा शेवट मराठवाड्यामध्ये दुष्काळी परिषदेने होणार आहे. क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या येडे मच्छिंद्र गावापासुन दुष्काळी परिषदेच्या प्रचार यात्रेस प्रारंभ होईल. ही यात्रा शिरोळ, शाहूवाडी, शिराळा, इस्लामपूर, आष्टा, मिरज, कवठेमहांकाळ, सांगोला, मंगळवेढा, सोलापूर, उस्मानाबाद, लातूरमार्गे निलंग्यात पोचेल. निलंगा येथे १२ डिसेंबरला दुष्काळी परिषद होईल.  

आपत्ती निवारण कायद्यात दुष्काळाचा समावेश करून एकरी पन्नास हजार रुपये शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या, गोवंश हत्या बंदी, वन्य जीव संरक्षण, पाळीव प्राण्यांची निर्दयी वागणूक,  आवश्यक वस्तू कायदा, भूसंपादन,  कमाल जमीन धारणा इत्यादी शेतकरी विरुद्ध कायदे रद्द करावेत, अशी आमची मागणी आहे. 

- रघुनाथ पाटील

प्रमुख मागण्या -

  • सरसकट सर्व शेतकर्‍यांना कर्जातून आणि वीज बिलातून मुक्त करा,
  • शेतकऱ्याला पुन्हा कर्ज होऊ नये म्हणून उत्पादन खर्च अधिक 50 टक्के नफा असा शेतीमालाला भाव द्या,  
  • शेतमालावरील निर्यात बंदी उठवा 
  • रेडीरेकनरप्रमाणे शेतीला कर्जपुरवठा करा आणि शेतकऱ्यांना कार्बन क्रेडिटचा फायदा मिळवून द्यावा

 

Web Title: Drought Conference of the Farmers Association at Nilanga on 12th December

टॅग्स