दक्षिण' मॉडेल बनविण्याच्या चळवळीला हवा वेग 

Subhash  Deshmukh
Subhash Deshmukh

सोलापूर : विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्यानंतर राज्यात दक्षिण सोलापूर तालुका एक मॉडेल तालुका करण्याचा निर्धार सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी केला होता. त्यादृष्टीने त्यांनी चळवळही सुरू केली. तालुका मॉडेल करणे म्हणजे नेमके काय करणे? हे जरी कळले नसले तरी त्या चळवळीला वेग येणे गरजेचे आहे. त्यात कितपत यश येते हे पाहणे औत्सुक्‍याचे आहे. 

अनेक वर्षांपासून कॉंग्रेसचे वर्चस्व असलेल्या दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघावर सुभाष देशमुख यांनी 2014 मध्ये भाजपचे "कमळ' फुलवले. त्या वेळी त्यांनी मतदारांना अनेक आश्‍वासने दिली. मंद्रूप तालुका करण्याचे आश्‍वासन केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी मंद्रूप येथे झालेल्या सभेत दिले होते. मात्र, त्याबाबत अद्यापही कोणतीच हालचाल नसल्याचे स्पष्ट होते. मागील पाच वर्षांत रस्ते विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी दिल्याचा दावा सहकारमंत्री करतात. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आकडेवारीकडे लक्ष टाकले असता ते सत्य असल्याचे दिसते. शासनाने यंदा दुष्काळी तालुक्‍यातून दक्षिण सोलापूरला वगळले होते. त्या वेळी सहकारमंत्री देशमुख यांनी एकाच दिवसामध्ये तालुक्‍याचा समावेश दुष्काळी तालुक्‍यात करण्याची धमक दाखविली.

वडापूर येथे बॅरेजेस बांधण्यासाठीच्या हालचाली त्यांनी सुरू केल्या आहेत. "सरकारी काम अन्‌ थोडे थांब' अशीच काहीशी स्थिती या तालुक्‍यातील कामांची असल्याचे दिसते. रस्त्यांसाठी त्यांनी 144 कोटी रुपयांचा निधी दिला आहे. मोहोळ-कुरुल-कामती-मंद्रूप-तेरामैल या रस्त्याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा त्यांनी प्राप्त करून दिला आहे. ग्रामीण पाणीपुरवठा योजनांसाठी 17 कोटींचा निधी दिला आहे. त्यातून जवळपास सात गावांच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्‍न मार्गी लागणार आहे. 

ठळक गोष्टी 
-बंदलगी बंधारा दुरुस्तीसाठी एक कोटी 56 लाख 
-सीतामाई तलावातील गाळ काढण्यासाठी एक कोटी 
-जलसंधारणाच्या कामासाठी तीन कोटी 
-बाजार ओट्यांसाठी एक कोटी 25 लाख 
-मंद्रूपला उपबाजार समिती 
-शहरातील ड्रेनेज लाइनसाठी 158 कोटी 
-संभाजी तलाव सुशोभीकरणासाठी पाच कोटी 
-मंद्रूप येथे औद्योगिक वसाहत 

राहून गेलेल्या गोष्टी 
-मंद्रूप तालुका निर्मिती 
-हिप्परगा तलाव एमटीडीसीकडे हस्तांतरित करणे 
-भीमा-सीना जोडकालवा बांधणे 
-होटगी तलाव भरण्यासाठी कालवा काढणे 
-जलसंपदा विभागाच्या वापरात नसलेल्या जमिनीचा वापर चांगल्या कामासाठी करणे 

तालुक्‍याचा शैक्षणिक दर्जा वाढविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. तालुक्‍यात आता जे सिंचनाचे क्षेत्र आहे, त्यामध्ये दुप्पट वाढ करणे शेतकऱ्यांसाठी आवश्‍यक आहे. त्याचबरोबर तालुक्‍यातील युवकांना रोजगार मिळवून देण्यासाठी मंद्रूप एमआयडीसीचा विषय मार्गी लावण्यावर आपला भर आहे. शिक्षण, सिंचन व रोजगार या गोष्टी पूर्ण झाल्यास तालुका मॉडेल होईल. 
- सुभाष देशमुख, सहकारमंत्री

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com