दुष्काळाचा फटका प्राण्यांनाही, शेतकरी छावणीच्या प्रतिक्षेत

drought
drought

मंगळवेढा - तालुक्यातील लाखापेक्षा अधिक पशुधन संकटात असून, मार्चअखेरीस देखील छावण्यास अद्याप मंजुरी न दिल्याने प्रशासनाच्या कारभाराबद्दल पशु पालकांसह संताप व्यक्त केला जात आहे. निवडणुकीच्या रणधुमाळीतील नेत्याची भूमिका आपल्याला कौल कसा मिळेल याकडे असून, प्रशासनाकडून मात्र छाणणीच्या नावाखाली तारीख पे तारीख दिली जात आहे.

ऑक्टोंबर महिन्यातच दुष्काळ जाहीर झाल्यामुळे तालुक्यातील ज्वारीचे शिवार रिकामे राहिले कडब्याचे दर गगनाला भिडले आहेत. मराठवाड्यातून विक्रेत्यानी मंगळवेढ्यात फलक लावले. काही शेतकऱ्यांनी आपली जनावरे मिळेल त्या कवडीमोल जरा सांगोला, जवळा, चडचण बाजारामध्ये विकून टाकली तर, दुधासाठी ठेवलेली जनावरे जतन करताना नाकी नऊ येत आहे. पशुसंवर्धन विभागाने चाय्रासाठी कडवळ, ज्वारी, मका, या बियाण्याचे वाटप केले. आणि या वाटप केलेल्या बियानातून मार्चअखेरपर्यंत माहिती न घेता 9800 मेट्रिक टन चारा उपलब्ध होणार असल्याचा दावा केला. महसूल विभागाने चारा छावणी सुरु करण्यासाठी चालढकल करण्याची भूमिका बजावली. तोकडे अनुदान आणि जाचक अटी असताना देखील पशुधन जगवण्यासाठी छावणीचे प्रस्ताव दाखल करून बरेच दिवस झाले तरी प्रस्तावाची छाननी करून चारा छावणी सुरू करण्याबाबत कुठल्या आदेश अद्याप प्राप्त झाले नाहीत महसूल विभागाकडून तारीख पे तारीख देवून पशुपालकाच्या सहनशिलतेचा अंत पाहत आहे. लोकसभेच्या आखाड्यातील संभाव्य उमेदवार हे आपल्याला मताधिक्य कसे मिळेल याकडे अधिक लक्ष देऊ लागल्यामुळे पशुधन संकटात असलेल्या पशुधन जगविण्यासाठी पशुपालकाशी संवाद न साधता आपल्या बाजूने मतदान कसे येईल याकडे लक्ष देत कार्यकर्तेकडून जातीय समीकरण जुळवण्यावर भर देऊ लागल्यामुळे मुक्या जनावराला कोण वाली नसल्याची परिस्थिती तालुक्यातील  झाली.

तर चारा डेपो व अन्य प्रश्नाबाबत 45 गाव कोरडवाहू समितीच्या वतीने तालुक्यातील विविध ठिकाणे आंदोलने केली पण याकडे शासनाने गांभीर्याने घेतले नाही. समस्याची भोग पशुपालकाच्या माथी मारून प्रशासन मोकळे होत आहे..

मी सध्या निवडणूकीच्या कामात आहे आलेले प्रस्ताव जिल्हास्तरावर पाठवले असून छाणणी होवून मंजूरी मिळताच छावणी सुरू करण्याचे आदेश दिले जातील.
 उदयसिह भोसले उपविभागीय अधिकारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com