माणच्या सोळा गावांच्या पाण्याचा मार्ग मोकळा

रुपेश कदम
गुरुवार, 29 मार्च 2018

पाणीपुरवठा विभागाने दिली प्रशासकिय मंजूरी

मलवडी- दुष्काळी माण तालुक्यातील 16 व खटाव तालुक्यातील 15 गावांना टेंभू उपसा सिंचन योजनेतून पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आज झालेल्या बैठकीत पाणीपुरवठा विभागाने प्रशासकीय मान्यता दिली असून, जलसंपदा विभागाने काम पुर्ण करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. त्यामुळे लवकरच माण तालुक्यातील महाबळेश्‍वरवाडी व खटाव तालुक्यातील मायणी तलावात पाणी येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

पाणीपुरवठा विभागाने दिली प्रशासकिय मंजूरी

मलवडी- दुष्काळी माण तालुक्यातील 16 व खटाव तालुक्यातील 15 गावांना टेंभू उपसा सिंचन योजनेतून पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आज झालेल्या बैठकीत पाणीपुरवठा विभागाने प्रशासकीय मान्यता दिली असून, जलसंपदा विभागाने काम पुर्ण करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. त्यामुळे लवकरच माण तालुक्यातील महाबळेश्‍वरवाडी व खटाव तालुक्यातील मायणी तलावात पाणी येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

सातत्याने दुष्काळ असलेल्या माण तालुक्यातील 16 गावांना निधी देण्यासाठी जलसंधारण विभागाने नूकतीच मंजूरी दिली. यामुळे जनतेत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. यासाठी मदत व पुनवर्सन मंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी मोलाचे सहकार्य केले आहे.

माण तालुक्याचे नेते अनिल देसाई व खटाव तालुक्याचे नेते डॉ. दिलिप येळगावकर यांनी चौदा वर्षे सातत्याने प्रयत्न केल्यामुळे माण व खटाव या तालुक्याला टेंभू योजनेतून कृष्णेचे पाणी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेसाठी शासनाने 9 कोटी 5 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या योजनेला पाणी पूरवठा विभाग व जलसंधारण विभागाने प्रशासकिय मान्यता दिली आहे. यामुळे आता माण मधील पूर्व भागातील सोळा गावांना याचा लाभ मिळणार आहे. 

तसेच या योजनेतून खटाव तालुक्यातील मायणी तलावात व माण मधील महाबळेश्वरवाडी तलावात पाणी साठा करण्यात येणार आहे. मायणी साठी 4 कोटी 72 लाख 79 हजार रुपये व माणच्या सोळा गावासाठी 4 कोटी  32 लाख 32 हजार रुपये असा निधी मंजूर केला आहे. मुबंई येथे झालेल्या बैठकीत जलसंपदा विभागाने पाणी आरक्षण करावे असा निर्णय झाला होता. त्याप्रमाणे जलसंपदा विभागाने माण व खटावसाठी पाणी आरक्षण करुन दिले.

आज झालेल्या बैठकीत माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर, मदत व पुनवर्सन विभागाच्या सचिव गाडगीळ मॅडम, पाणीपुरवठा विभागाचे सचिव गोयल साहेब, जलसंपदा विभागाचे सचिव पानसे साहेब तसेच जिल्हा बँकेचे संचालक अनिल देसाई, युवा नेते सचिन गुदगे, सातारचे अप्पर जिल्हाधिकारी यांच्यासह सातारा जिल्हा जलसंपदा विभागाचे गुणाले साहेब, कृष्णा खोरे विभागाचे घाटे साहेब, टेंभू उपसा योजनेचे कार्यकारी अभियंता पवार साहेब उपस्थित होते.

माण तालुक्यातील वरकूटे, शेणवडी, विरळी, पानवण, काळचौंडी, जांभूळणी व परिसरातील सोळा गावांना या योजनेतून पाणी मिळणार आहे. माणच्या या सोळा गावांना कृष्णेचे पाणी मिळावे यासाठी 2003 साली 16 दिवस माण तहसील कार्यालया समोर ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलन केले होते. या आंदोलनाचे नेतृत्व अनिल देसाई यांनी केले होते. गेली पंधरा वर्षे अथक प्रयत्न करुन देसाई यांनी अखेर माणचा पाणी संघर्ष यशस्वी केला.

लवकरच नामदार चंद्रकांत पाटील व नामदार गिरिष महाजन यांचा सत्कार सोहळा व भूमीपूजनाचा कार्यक्रम होणार असल्याचे अनिल देसाई यांनी सागितले.

Web Title: Drought-hit Khatav & man to get water from tembhu irrigation project