अक्कलकोट तालुक्याचा दुष्काळी पाहणी दौरा संपन्न

राजशेखर चौधरी
मंगळवार, 16 ऑक्टोबर 2018

अक्कलकोट - अक्कलकोटला झालेल्या कमी पावसाळ्याच्या पार्श्वभूमिवर तीव्र दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. आगामी काळात करावयाच्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांचा पाहणी दौरा पूर्ण झाला. त्यानंतर पंचायत समिती येथे आढावा बैठक घेण्यात आली. 

अक्कलकोट - अक्कलकोटला झालेल्या कमी पावसाळ्याच्या पार्श्वभूमिवर तीव्र दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. आगामी काळात करावयाच्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांचा पाहणी दौरा पूर्ण झाला. त्यानंतर पंचायत समिती येथे आढावा बैठक घेण्यात आली. 

बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलापूर जिल्ह्याच्या दुष्काळी दौऱ्यावर येत आहेत. यावेळी मुख्यमंत्र्यांकडे दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी निधी मागणी करण्यात येणार आहे. दुष्काळी परिस्थितीचा आढावा अधिकारी व कर्मचारी वर्गाने गांभीर्याने घ्यावा. दुष्काळाबाबत शासन जनतेच्या पाठीशी असणार आहे अशी ग्वाही पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी दिली. 

देशमुख यांनी सोमवारी अक्कलकोट तालुक्यातील जेऊर, बोरोटी, गुरववाडी, नागणसूर, तोळणूर, अक्कलकोट स्टेशन, कडबगाव, उडगी आदी गावांचा दुष्काळी पाहणी दौरा केला. अकलकोट पंचायत समितीच्या सभागृहात विविध खात्याचे अधिकारी, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, नागरिकांच्या समावेत दुष्काळी परिस्थितीची आढावा बैठक पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या बैठकीस आमदार सिद्धाराम म्हेत्रे, प्रांताधिकारी ज्योती पाटील, तहसीलदार अंजली मरोड, पंचायत समिती सभापती सुरेखा काटगाव, नगराध्यक्षा शोभा खेडगी, भाजपा तालुकाध्यक्ष सचिन कल्याणशेट्टी, उपसभापती प्रकाश हिप्परगी नगरसेवक महेश हिंडोळे, जि प सदस्य आनंद तानवडे, बसनिंग खेडगी, भीमा कापसे, कांतू धनशेट्टी आदींची प्रमुख उपस्थिती होती. 

पालकमंत्री देशमुख पुढे म्हणाले, पिक विमा ज्या शेतकऱ्यांनी भरलेले आहेत त्यांना तात्काळ मदत मिळवून देण्यात येईल. शासन विविध उपाययोजना करण्यासाठी कटिबद्ध आहे. शेतकऱ्याच्यां पिकाचें नुकसान झाले आहे. बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलापूर जिल्ह्याच्या दुष्काळी दौऱ्यावर येत आहेत. यावेळी मुख्यमंत्र्यांकडे दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी निधी मागणी करण्यात येणार आहे. दुष्काळाबाबत शासन जनतेच्या पाठीशी असणार आहे अशी ग्वाही पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी दिली. आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांनी अक्कलकोट तालुक्यात केवळ ३० टक्के पाऊस झाला आहे. दुष्काळाच्या तिव्रतेत तालुका आहे. गाव निहाय आराखडा करण्याच्या सूचना संबंधित अधिकारी वर्गांना दिले असून रोजगार हमीची कामे तालुक्यात सुरु करा. या बैठकीचे प्रास्ताविक प्रांताधिकारी ज्योती पाटील यांनी केले. 

या बैठकीस राजेंद्र बंदीछोडे, सिद्धार्थ गायकवाड, प्रदीप पाटील, विश्वनाथ हडलगी, नागेश कुंभार आदींसह विविध खात्यांचे अधिकारी, विविध पक्षांचे पदाधिकारी, नागरिक, ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, तलाठी, मंडळ अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: drought nspection Tour of Akkalkot taluka