'जयहिंद शुगर राबविणार ४०० एकरावर हिरवा चारा प्रकल्प'

Akkalkot
Akkalkot

अक्कलकोट : यावर्षीच्या कमी पावसाळ्याने सध्या भेडसावत असलेल्या तीव्र दुष्काळी परिस्थितीला तोंड देण्यासाठी जयहिंद शुगर आचेगावने साहाय्यक पोलीस निरीक्षक नाना कदम आणि महाराष्ट्र शासन कृषी व पशुधन विभागाच्या सहकार्याने ४०० एकरावर हिरवा चारा प्रकल्प राबविणार आहे. त्याचा शुभारंभ कारखाना कार्यस्थळावर हुमानाबादचे रेणुका गंगाधर शिवाचार्य महास्वामी, डॉ जयसिद्धेश्वर महास्वामी, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, कृषी सभापती मल्लिकार्जुन पाटील,चेअरमन बब्रुवाहन माने देशमुख, व्हाईस चेअरमन विक्रमसिंह पाटील,साहाय्यक पोलीस निरीक्षक नाना कदम, पशुसंवर्धन उपायुक्त नाना सोनवणे
यांच्या उपस्थितीत करण्यात आला.

जयहिंद कारखान्यावर २१ कोटी लिटर क्षमतेचे शेततळे असून त्याचा वापर करून कारखान्याचे ८५ एकर आणि परिसरातील ३१५ एकर जमिनीवर असे एकूण ४०० एकरावर हिरवा चारा लागवड करण्यात येणार आहे. पशुसंवर्धन सभापती मल्लिकार्जुन पाटील आणि नाना सोनवणे हे पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्या सहकार्याने शासनाकडून हेक्टरी खत आणि बियाणे यासाठी चार हजार रुपये अनुदान मिळवून देण्यात येणार आहेत. यात बहुवार्षिक ठोंबे, आफ्रिकन टाॅल मका, मालदांडी ज्वारी आदींची लागवड केल्याने शेतकऱ्यांना पशुधनासाठी अडचणीच्या काळी मदत होणार आहे.याचबरोबर कारखाना उसाचा वाडा सर्व एकत्र करून कारखाना स्थळी त्याच्यावर चुन्याची निवळी मारून डेपो मारण्यात येणार आहे. जेणेकरून ते गरजूंना वर्षभर वापरता येणार आहे.याचबरोबर कारखान्याकडून येत्या पावसाळ्या पर्यंत गोधन सांभाळण्यासाठी गोशाळा सुरू करण्यात आली आहे. त्यात शेतकऱ्यांनी आपल्या गायी आणून सोडणे त्यांना चारा आणि पाणी याची व्यवस्था कारखाना करणार आहे.जनावरांना रासायनिक घटक विरहित सेंद्रिय घटक वापरून चारा निर्मिती करण्यात येणार आहे.ज्यांच्याकडे पाणी आहे त्यांना चारा पिकविण्यासाठी शासन बियाणे व खत देणार आहे तसेच कारखाना खत म्हणून मोफत प्रेसमड देणार आहे.याप्रकारे जयहिंद चेअरमन बब्रुवाहन माने देशमुख व विक्रमसिंह पाटील यांच्याकडून स्वयंस्फूर्तीने चारा आणि पाणी याची व्यवस्था करून आपल्याला ऊस पूरविणाऱ्या शेतकऱ्यांना संकट काळी मदत करून व्यवसायाबरोबरच सामाजिक बांधिलकी जपली जात आहे.

डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी आणि नाना कदम यांचा १०० गावासाठी ' समर्थ दिलासा ' यात्रा
अक्कलकोट व दक्षिण सोलापूर तालुक्यात आणि परिसरातील १०० गावासाठी
डॉ.जयसिद्धेश्वर महास्वामी आणि नाना कदम हे दोघेही रविवार ता. ४ नोव्हेंबर( वसूबारस)पासून ' समर्थ दिलासा ' यात्रा सुरू करण्यात आली आहे.यावेळी सध्या पडलेला दुष्काळास समर्थपणे तोंड देण्यासाठी मार्ग सांगून आणि शेतकऱ्यांना दिलासा देण्यात येणार आहे.दुष्काळ ही संधी समजून कमीत कमी पाणी आणि खर्च यातून रासायनिक खते न वापरता शाश्वत आणि सीता शेती (Sustainable integrated Technology Agriculture) कशी करावी याची माहिती देणार आहेत. यासाठी जयहिंद कारखान्यावर तीन वेगवेगळ्या जातीच्या उसाची पाच एकरसाठी नमुना लागवड केली जाणार आहे.यातून शेणखत,गोमूत्र,जीवामृत,घनजिवामृत व गांडूळखत याचा वापर कसा करावा ही माहिती दिली जाणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com