दुष्काळी परिस्थितीतही पंचायत समितीच्या स्वागतासाठी श्रीगोंद्यात बडेजाव 

दुष्काळी परिस्थितीतही पंचायत समितीच्या स्वागतासाठी श्रीगोंद्यात बडेजाव 

श्रीगोंदे (नगर) - पाच वर्षांतील कामांचा आढावा घेण्यासाठी आलेल्या पंचायत समितीच्या स्वागतासाठी येथे मोठा खर्च करण्यात आला. पाहुण्यांची बडदास्त ठेवण्यात कुठेही कमीपणा होऊ नये म्हणून गालिचे, फुलांची सजावट, सुका मेवा, स्वागतासाठी महागडे साहित्य, आकर्षक पुष्पगुच्छ होते. मात्र जनता दुष्काळात होरपळत असताना हा लाखोंचा खर्च समितीला खुश करण्यासाठी का झाला? या प्रश्नावर 'हे आम्ही सांगितले नव्हते' असे सांगत समिती श्रीगोंदेकरांचा पाहुणचार अर्धवट सोडून उपाशीच कर्जतकडे मार्गस्थ झाले.

श्रीगोंदयाची पंचायत समिती पाहुण्यांच्या स्वागतासाठी सजली होती. कागदावर काम चांगले आहे हे दाखवितानाच परिसरातील प्रसन्न वातावरण येणार सामान्य माणूस आज अनुभवत होता. समितीचे प्रमुख सुधीर पारवे, बाबुराव पाचर्णे, तुकाराम काते, दीपक चव्हाण, अमरनाथ राजूरकर या आमदारांनी व त्यांच्या सोबतच्या अधिकाऱ्यांनी आज अगोदर मांडवगण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात भेट देत तेथील मुले व मुलींच्या जन्मदरातील तफावतीवर चर्चा केली.

समिती नंतर पंचायत समितीत आली आणि तेथील गालिचा, कुंडीतील फुलांची झाडे, सभागृहातील प्रसन्न वातावरण व त्यासाठी केलेला मोठा खर्च पाहुण्याच्या नजरेतून सुटला नाही.  त्यातच माध्यमांनी बाहेर दुष्काळाने जनता होरपळत आहे, पाऊस नाही या परिस्थितीत समितीच्या स्वागतासाठी लाखो रुपयांची उधळपट्टी कशासाठी या प्रश्नावर समिती सदस्य आवाक झाले. अंतर्गत गोपनीय बैठकीत नेमके काय झाले हे समजले नाही मात्र बाहेर आल्यावर समितीप्रमुख पारवे पत्रकारांशी बोलताना म्हणाले, आमच्या स्वागताला हा खर्च करण्यासाठी सांगितले नव्हते. आम्ही यांचा चहा सुद्धा घेत नाही. जिल्हा परिषद त्यावर खर्चाची तरतूद करते. आम्ही श्रीगोंदे पंचायत समिती कारभार कसा सुरू आहे तो अधिक गतिमान कसा होईल याची पाहणी करण्यासाठी आलो आहोत. आलेला निधी खर्च झाला आहे का, अफरातफरीची प्रकरणात कारवाई व वसुली झाली आहे का, त्यांची जबाबदारी निश्चित झाली का ही माहिती घेतली आहे. 

पंचायत समितीच्या बैठकांना जिल्हा परिषदने प्रतिनिधी दिला पाहिजे. मुख्याधिकाऱ्यांनी त्याची सुरुवात स्वतःपासून श्रीगोंदयातून करण्याच्या सूचना दिल्याचे पारवे म्हणाले.

दरम्यान समितीच्या पाहुणचारासाठी स्थानिक अधिकाऱ्यांनी मोठी तयारी केली होती. मात्र माध्यमांचा आक्षेप पाहून समिती श्रीगोंदयातील भोजन टाळून उपाशीच हिरडगाव ग्रामपंचायत व प्राथमिक शाळेला भेट देत कर्जतकडे मार्गस्थ झाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com