दुष्काळाची छाया: करमाळ्यात सुर्यफुलात सोडली जनावरे

अण्णा काळे
रविवार, 12 ऑगस्ट 2018

यावर्षी तालुक्‍यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे 24 जुलैपासून कसलाही पाऊस पडला नाही. सर्वत्र पिके जळु लागल्याचे चित्र आहे. पिकांची सद्यपरिस्थितीचा अवाहल सरकारकडे कळवला आहे. 
- संजय पवार, तहसीलदार, करमाळा 

करमाळा : पावसाळ्याच्या सुरुवातील यंदा जोरदार पावसाने हजेरी लावली. हवामान विभागाने सुद्धा यंदा चांगला पाऊस पडले, असा अंदा वर्तवला होता. त्यामुळे मोठ्या आपेक्षेने शेतकऱ्यांनी खरिपाची पेरणी केली. मात्र, पुढे पाऊसच झाला नसल्याने आता पिके गेल्यात जमा आहेत. काही शेतकऱ्यांनी तर पिकात जनावरे सोडली आहेत.

पाऊस वेळेत झाला तर काही प्रमाणात उत्पादन खर्च निघेल, अन्यथा बियाणांचा खर्च सुद्धा निघणार नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे. आतापर्यंत सरासरी 500 मिलीमीटर पाऊस होणे अपेक्षीत होते, परंतु 100 मिलीमीटर सुद्धा अद्याप पाऊस झालेला नाही. 

करमाळा तालुक्‍यात 12350.25 हेक्‍टरवर खरिपाची पेरणी झाली होती. यात तूरीचे क्षेत्र सर्वाक्षिक म्हणजे 2585 हेक्‍टर आहे. त्यापाठोपाठ मकाचे 1869 हेक्‍टर आहे. याशिवाय सुपर्यफुल 765 हेक्‍टर, बाजरी 946 हेक्‍टर याशीवाय उडीद, मुग, तीळ, कारळे, सोयाबीन, कापूस याचा सामावेश आहे. पाऊस चांगला झाल्याने पिकही जोमात होती. काही ठिकाणी तर खुरपणी सुद्धा झाली होती. त्यामुळे पिकांना तेज होते. मात्र पुढे पाऊसच झाला नाही. कांद्याची लागण सुद्धा बऱ्यापैकी झाली आहे. पाऊस नसल्याने पिके सुकली आहेत. उन पडत नसले तरी दिवसभर ढगाळ वातावरण आणि वाऱ्यामुळे सध्या ताल्याकुयावर दुष्काळाची छाया आहे. 

तालुक्‍यात आतापर्यंत फक्त 87 मिलीमीटर पाऊसाची नोंद आहे. जेऊर, कोर्टी, केम, अर्जूननगर, केत्तूर, उमरड या सर्कलमध्ये निल तर त्यात करमाळा सर्कमध्ये 1 मिलीमीटर पाऊसाची नोंद आहे. विहीरींना तळ गाठल्याने पिकांबरोबर गावागांवमध्ये पिण्याच्या पाण्याची सुद्धा टंचाई निर्माण झाली आहे. 

यावर्षी तालुक्‍यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे 24 जुलैपासून कसलाही पाऊस पडला नाही. सर्वत्र पिके जळु लागल्याचे चित्र आहे. पिकांची सद्यपरिस्थितीचा अवाहल सरकारकडे कळवला आहे. 
- संजय पवार, तहसीलदार, करमाळा 

शेतकरी हा कायम आशेवर जगतो. पाऊस न झाल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरलेली पिके जळून चाललेली आहेत. सरकारने शेतकऱ्यांसाठी ठोस निर्णय घेऊन मदत करावी. पिक विम्या भरलेल्या शेतकऱ्यांना मोबदला मिळावा. 
- दत्तात्रय वाळूजकर, शेतकरी, पोथरे 

जूनच्या सुरुवातीला थोडाफार पाऊस झाला. त्यावर सूर्यफूल, बाजरी, उडीद, तूर अशी पिके पेरली आहेत. पेरणी झाल्यापासून एकही चांगला पाऊस झाला नाही. त्यामुळे ही पिके जळून चालली आहेत. नुकसान भरून काढण्यासाठी सरकारने मदत करावी. 
- शिवाजी पाटील, शेतकरी, गुळसडी

Web Title: drought situation in Karmala