नियोजनाच्या अभावामुळे सिने कठी 'दुष्काळ'!

sina river
sina river

सोलापूर : नियोजनाचा अभाव आणि राजकीय नेत्यांची उदासिनताच सिना नदी कठावरील गावे कोरडी ठेवण्यास कारणीभूत ठरली आहे. सोलापूरसह उस्मानाबद व अहमदनगर जिल्ह्यातील गावांना वरदायिनी ठरलेली सिना आता अपवाद वगळता बारा महिनेही कोरडी राहत आहे. त्यामुळे या भागाला सतत दुष्काळी सामना करावा लागत आहे.

सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील पूर्व भागातील सिने काठची खडकीपासून करंजेपर्यंतची व उस्मानाबाद जिल्ह्यातील डोणज, देऊळगाव, आलेश्वर आदी गावांसह नगर जिल्ह्यातील जवळा, आगी, दिगी व इतर गावांना पाणी मिळत नाही. त्यांना टंचाईतही पाणी मिळावे म्हणून कुकडीचे पाणी देणे आवश्यक आहे. करमाळा तालुक्यातून कुकडीचे पाणी सिना नदीत जाऊ शकते. परंतु योग्य नियोजनाची गरज आहे. मांगी तलावात कुकडीचे पाणी आणले जाते. त्या तलावातून नदीपर्यंत डावा आणि उजवा असे दोन कालवे आहेत. यातील एका कालव्याने पाणी सोडल्यास सिना कोळगाव धरणात पाणी येऊ शकते. तर दुसर्या कालव्यातून किंवा कान्होळा नदीतून पाणी सोडल्यास संगोबा आणि पोटेगाव हे बंधारे भरले जाऊ शकतात. तरटगाव व खडकी हे बंधारे भरण्यासाठी चोंडी येतून पाणी सोडता येऊ शकेल.

मांगी तलावातून सिनेपर्यंत लाखो रुपये खर्चून चाऱ्या केल्या आहेत. परंतु यातील काही चार्यात अद्याप एखदाही पाणी आलेले नाही. त्यात शेतकर्यांच्या जमिनी सुध्दा पडीक पडल्या आहेत. राजकिय ईच्छा शक्ती आणि कालवा समितीच्या बैठकीत नियोजन झाल्यास प्रायोगिकतत्वावर पाणी सोडता येऊ शकेल. पुढे ते कायम करून हा भाग हिरवागार करता येऊ शकेल.

सिना नदीत कुकडीचे पाणी सोडावे यासाठी पंचायत समितीत ठरवा केला आहे. या पाण्याबाबत राजकारण न करता सर्वांनी रस्त्यावर येण्याची गरज आहे. पाणी परवठ्यासाठी टँकर व ईतर योजनांसाठी सरकार लाखो रुपये खर्च करत आहे. कायम तोडगा काढायचा असेल तर नदित पाणी सोडणे आवश्यक आहे. मांगी तलावातून ते शक्य आहे.
- अॅड. राहुल सावंत,सदस्य, पंचायत समिती, करमाळा

आतापर्यंत फक्त पाण्याच्या नावावर सर्व निवडणुका झाल्या. परंतु नियोजनाअभावी प्रत्यक्षात पाणी मात्र पुर्ण क्षमतेने कधीच आल नाही. मांगी तलावापर्यंत तुकडीचा कॅनॉल पूर्ण असून मांगी तलावातून कान्होळा नदीतून सिना नदीत पाणी सोडले तर खर्चही होणार नाही शिवाय या तालुक्यातील उत्तर भागातील 70 टक्के गावे ओलिताखाली येतील.
- विशाल झिंजाडे, पोथरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com