सोलापूर: मोहोळ तालुक्यात वरुणयंत्राचा प्रयोग करण्याचे आदेश

राजकुमार शहा 
शनिवार, 22 सप्टेंबर 2018

पावसाळा सुरू होऊन तब्बल चार महिन्याचा कालावधी लोटला आहे. परंतु तालुक्यात एकही दमदार पाऊस पड़ला नाही. त्यामुळे ऊस, मका या सह बोर, डाळींब ,द्राक्ष, केळी या फळबागा धोक्यात आल्या आहेत. तर, विहीरी व बोअर यांच्या पाणी पातळीत घट झाली आहे. त्यामुळे तालुक्यात दुष्काळ सदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे.

मोहोळ : कृत्रिम पावसासाठी ता 22 ते 24 सप्टेंबर या कालावधीत मोहोळ तालुक्यातील सर्व गावात वरुणयंत्राचा प्रयोग करण्याचे आदेश जिल्हा प्रशासना कडुन प्राप्त झाले असुन, या साठी ग्रामस्थांनी सहकार्य करावे तशा सुचना तलाठी व मंडलाधिकारी यांना आयोजित बैठकीत केल्या असल्याची माहिती महसूल नायब तहसीलदार जीवन क्षीरसागर यांनी दिली.

पावसाळा सुरू होऊन तब्बल चार महिन्याचा कालावधी लोटला आहे. परंतु तालुक्यात एकही दमदार पाऊस पड़ला नाही. त्यामुळे ऊस, मका या सह बोर, डाळींब ,द्राक्ष, केळी या फळबागा धोक्यात आल्या आहेत. तर, विहीरी व बोअर यांच्या पाणी पातळीत घट झाली आहे. त्यामुळे तालुक्यात दुष्काळ सदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकरी हिशोबा प्रमाणे आता उतरा व हस्त ही दोनच पावसाची नक्षत्रे राहीली आहेत.

सध्या पाऊस पडेल असे ढगाळ वातावरण आहे, प्रत्येक गावात उथळ जाग्यावर पिंपळ , उंबर व कडुनिंब या झाडांचे ओले किंवा वाळलेले सरपण एका ठिकाणी जमा करून ते पेटविल्यास, मोठ्या प्रमाणात त्याचा धुर होतो. त्यासाठी मोठ्या मिठाचा वापर करावयाचा आहे. प्रचंड धुर झाल्यावर तो धुर ढगापर्यंत गेल्या वर त्याची रासायनिक प्रक्रिया होऊन पाऊस पडण्यास मदत होणार आहे. हा प्रयोग दुपारी चार ते सहा या वेळेत करावयाचा असल्याचे क्षीरसागर यांनी सांगितले.

Web Title: drougth situation in Mohol Solapur