इथे गुन्ह्याअधी होतीय औषधी गोळ्यांची नशा...

Drug addiction used to be here before crime ...
Drug addiction used to be here before crime ...

सांगली : गर्द, गांजा यासह स्वतात नशा असणाऱ्या औषधी गोळ्यांचे सेवन करणाऱ्या नशेबाजांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे गेल्या दीड महिन्यांतील लॉकडाऊन काळातही गुन्हेगारीचा आलेख कमी होताना दिसेना असे चित्र आहे. खुन, खुनी हल्ले, मारामारी यासह गंभीर गुन्ह्यांची संख्या वढतच आहे. गुन्ह्याअधी औषधी गोळ्यांची नशा करूनच हे गंभीर गुन्हे घडल्याचे पोलिस तपासात समोर आल्याचे चित्र आहे. यात तरूणाईसह अल्पवयीन मुलांचा सभाग असून "सैरभैर' झालेल्या नशेबाजांची ही गुन्हेगारी रोखण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान असून सांगलीकरांचीही डोकेदुखी बनली आहे. 

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाउन करण्यात आले आहे. संचारबंदी असल्याने अत्यावश्‍यक सेवा वगळता लोकांना घराबाहेर येत येत नाही. पोलिसही चोवीस तास "ऑन ड्युटी' आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलिसांनी महत्वाची भूमिका हाती घेतली. दुसऱ्या बाजूला जिल्ह्यातील गुन्हेगारीचा वाढता आलेख कमी होतांना दिसला नाही. एकामागून एक मुदडे पडत गेले. गल्लीबोळात तलवार, चाकू, कोयते करून खुनी हल्ले झाले. बलात्काराच्या घटना घडल्या. तसेच घरफोडी, चोरीही याकाळात घडली.

पोलिसांनी गंभीर गुन्ह्यातील गुन्हेगारांना संशयितांना तत्काळ गजाआड केले. मात्र, संशयितांना पोलिस ठाण्यात आणले तर त्यापूर्वीच संशयित गुन्हेगार विशिष्ठ कंपनीची पेनकिलर किंवा झोपेच्या गोळ्यांचे सेवन केलेले असते. त्याला पोलिसांनी कितीही प्रसाद दिला तरीही बहाद्दर काहीच होत नाही. नशेबाजांना थर्ड डिग्री देणेही पोलिसांनी कठीण होते. अंमली पदार्थ परवडणारे नसल्याने नशेची पद्धत बदली आहे. व्हाईटनर, आयोडेक्‍स, पंक्‍चर काढण्याचे सोल्युशन वापरून नशा केली जात आहे. मात्र आता कोणत्याही औधष दुकानात 25-30 रुपयांना डॉक्‍टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळतात. त्यावर ना पोलिस ना औषध प्रशासन कारवाई करत नाही. त्यामुळेच गुन्हेगारांना फावते आहे. यावर पोलिसांसह प्रशासनाने गांभिर्याने घेवून संयुक्त कारवाई केली पाहिजे. 

पोलिस ठाण्यांची कारवाई नाही 
गुन्हेगारीत नशेबाजांची संख्या अधिक असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक सुहैल शर्मा यांनी दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने कारवाई केली. अनेक गांजा तस्कर, गोळ्या विक्रेत्यांवर कारवाईचा बडगा उगारला. पण नव्याचे नऊचे दिवसच ही कारवाई झाली. मात्र, एससीबी वगळता अन्य पोलिस ठाण्यांना ही कारवाई करणे जमले नाही. 

आकडेवारीवर नजर 
खून 12, दुखपती 81, चोऱ्या 29, घरफोडी 16

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com