दुबईत सचिन दाखवणार भारतीय शैली! 

परशुराम कोकणे
बुधवार, 11 एप्रिल 2018

सोलापूर - सोलापूरचा युवा चित्रकार सचिन खरात याचे दुबईतील वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये 18 ते 21 एप्रिल दरम्यान चित्रप्रदर्शन होणार आहे. नंदी, घोडा, भारतीय स्त्रिया, विष्णू यासह इतर चित्रांमधून सचिन भारतीय शैलीचे दर्शन घडविणार आहे. 

मुंबईतल्या रिदम आर्ट गॅलरी यांनी या प्रदर्शनासाठी सचिनला मदत केली आहे. जगभरातून अनेक चित्रकार या प्रदर्शनात सहभागी होणार असून दुबईसह जगभरातून कलाप्रेमी प्रदर्शन पाहण्यासाठी येणार आहेत. 10 चित्रांमधून भारतीय शैलीची मांडणी करण्यात आली आहे. 14 एप्रिल रोजी सचिन हा सोलापूरहून दुबईला जाणार आहे. दुबईत होणारे सचिनचे हे सहावे प्रदर्शन आहे. यापूर्वी ग्रुपने प्रदर्शन केले आहे, आता सचिनच्या चित्रांचे स्वतंत्र स्टॉल असणार आहे. 

दुबईतील वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये होणाऱ्या प्रदर्शनाची उत्सुकता आहे. जगभरातील कलाप्रेमींसमोर भारतीय शैलीची मांडणी करण्याची संधी मला मिळाली आहे. 
- सचिन खरात, युवा चित्रकार

Web Title: dubai photo exhibition sachin kharat artist