दुधगाव खोची बंधारा पाण्याखाली ; मिरज पश्चिमचा कोल्हापूरशी संपर्क तुटला

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 जुलै 2018

तुंग : पावसाच्या संततधारमुळे वारणा नदीच्या पाणी पात्रात झपाट्याने वाढ झाली आहे. मिरज तालुक्‍यातील दुधगाव - खोची बंधारा पाण्याखाली गेला आहे. तसेच येथील पुलाचे कामही सध्या अपूर्ण असल्यामुळे दुधगावसह मिरज पश्‍चिम भागातील गावांचा कोल्हापूर जिल्ह्याशी असलेला संपर्क तुटला आहे.  

दुधगाव - खोचीदरम्यान वारणा नदीवर बंधारा आहे. यावरून मिरज पश्‍चिमसह दुधगाव परिसरातील ग्रामस्थांची वाहतूक दळणवळण मोठ्या प्रमाणात चालते. या भागातून कोल्हापूरला जाण्यासाठी हा मार्ग जवळचा आहे. या बंधाऱ्याची उंची कमी असल्याने तसेच अवजड वाहतुकीसाठी योग्य नसल्याने त्यांच्या शेजारी पुल मंजूर होऊनही गेली अनेक वर्षांपासून त्याचे बांधकाम अपूर्णावस्थेत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षापणाचा नागरिकांना त्रास भोगावा लागत आहे.

आजही वाहतूक याच बंधाऱ्यावरुनच चालते. तसेच परिसरातील लोकांना वडगाव ,कोल्हापूरला जाण्यासाठी बागणी, शिगावमार्गे जावे लागत आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे नदीच्या पाण्यात वाढ होऊन हा बंधारा पाण्याखाली गेला असून सध्या यावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. 

Web Title: Dudhgaon Khochi dam is under water Miraj West to Kolhapur connection lost