उंब्रज शिवारात बिबट्या आढळल्याने भीतीचे वातावरण

उंब्रज शिवारात बिबट्या आढळल्याने भीतीचे वातावरण

उंब्रज (कऱ्हाड)- शिवडे (ता. कऱ्हाड) येथील महामार्गा लगतच्या माळवीच्या शिवारात शेतात पाणी पाजण्यास गेलेल्या शेतकऱ्यांना व वास्तव्यास असणाऱ्या विटभट्टी कामगारांना बिबट्या दिसून आला. त्यामुळे त्या भीतीचे वातावरण आहे. सकाळी सातच्या सुमारास लोकवस्तीत बिबट्याच्या दिसला. 

शिवडे येथील हायवेलगतच्या मळवी नावाच्या शिवारात विटभट्टी कामगार वास्तव्यास असून सकाळी विटभट्टी कामगार रेवण राठोड यांना त्यांच्या झोपडीनजीक बिबट्याचे दर्शन झाले. ते कामानिमित्त विटभट्टीकडे निघाले असता बिबट्या त्याना रस्ता ओलांडून शेतात जाताना दिसला तर शिवडे येथील भैरवनाथ पुजारी व महेश घाडगे हे सकाळी शेतात पाणी पाजण्यासाठी गेले असता त्यांना बिबट्या दिसून आला. त्यामुळे अनेक शेतकरी शेताकडे जाण्यासाठी घाबरू लागले आहेत.

यामुळे बिबट्याच्या भितीने कामगारांना आपला जीव मुठीत घेऊन रात्र जागून काढावी लागत आहे. तर याच परिसरातील शेतात बिबट्याच्या पायाचे ठसे आढळून आल्याने शेतकर्यानी शेतातील कामे बाजूला ठेवत शेताकडे जाण्यास टाळले असून भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच वराडे येथील ग्रामस्थांना मागील तीन-चार दिवसांपुर्वी बिबट्या दिसून आला होता. यानंतर दोन दिवसानंतर शिवडे येथील लोकवस्तीत दिसून आल्याने ग्रामस्थांच्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी वनविभागाकडून बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थांच्यातून होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com