नगरपालिकेच्या विकासकामात ठेकेदाराने केलेल्या विलंबामुळे पालिकेचे नुकसान 

हुकूम मुलाणी
गुरुवार, 21 जून 2018

नगरपालिकेच्या विकासकामात ठेकेदाराने केलेल्या विलंबामुळे नगरपालिकेचे 34 लाखाचे नुकसान झाले आहे. ठेकेदारांने नगरसेवकासह कर्मचाऱ्याला केलेली दमदाटी, ठेकेदारांनी बनावट कागदपत्रे सादर करुन मिळवलेला ठेका यावर तब्बल तासभर रणकंदन झाले.

मंगळवेढा - नगरपालिकेच्या विकासकामात ठेकेदाराने केलेल्या विलंबामुळे नगरपालिकेचे 34 लाखाचे नुकसान झाले आहे. ठेकेदारांने नगरसेवकासह कर्मचाऱ्याला केलेली दमदाटी, ठेकेदारांनी बनावट कागदपत्रे सादर करुन मिळवलेला ठेका यावर तब्बल तासभर रणकंदन झाले. 

पालिकेच्या सभागृहात झालेल्या पार पडलेल्या वार्षिक सभेस नगराध्यक्षा अरुणा माळी, उपनगराध्यक्ष चन्द्रकांत घुले, पक्षनेते अजित जगताप, प्रविण खवतोड़े, संकेत खटके, राहुल सावंजी, बशीर बागवान, अनिल बोदाड़े, अनीता नागणे, भागीरथी नागने, लक्ष्मी म्हेत्रे, राजश्री टाकणे, सब्जपरी मकानदार, निर्मला माने, पार्वती जाधव, रतन पडवळे, आदीसह पाणी पुरवठा अभियंता चेतन माळी, बांधकाम अभियंता तोडकरी, लेखापाल राम पवारसह कर्मचारी उपस्थित होते. 

जिजाऊ शॉपींग सेंटर या व्यापारी संकुलनातील काम करण्याचा ठेक्यातील कालावधी संपल्याने 15 महिने जादा झाल्याने या गाळ्यातील भाड्यापोटी 11 लाख व कामातील विलंब दंड 23 लाखाचे पालिकेचे नुकसान झाले असून याला जबाबदार कोण असा सवाल यावेळी करण्यात आला. त्या कामाचे बिल देणे असले तरी उर्वरीत दंडाची रक्कम कशी वसुली करणार असे विचारताच बांधकाम अभियंता निरुत्तर झाले कायदेशीर बाबी तपासून कार्यवाही करणार असल्याचे त्यांनी सांगितले. ठेकेदार प्रतिक किल्लेदार यांनी बनावट कागदपत्रे देवून पालिकेची फसवणूक केल्याबद्दल काळ्या यादीत टाकण्यावर पक्षनेते व नगरसेविकानी जोर धरला त्याच्यावर आठ दिवसात कारवाईचा प्रस्ताव न दिल्यास नगर अभियंता व मुख्याधिकारी यांच्यावर कारवाईचा प्रस्ताव देण्याचा ठराव मंजूर झाला.

सर्वप्रथम पक्षनेते अजित जगताप व नगराध्यक्षा अरूणा माळी यांच्यात खडाजंगी होवून तीन महिने मासिक सभा घेतली नाही नगरपालिकेत कामकाज कायद्याला धरून झाले पाहिजे पालिकेचा वापर ठेकेदाराच्या हितासाठी करू नका. कामातील विलंबामुळे निधी परत गेल्यावर जबाबदारी कुणाची या वादात नगरसेविका अनिता नागणे यांनी मध्यस्थी करून या विषयावर चार दिवसात बैठक घ्यावी अशी सुचना मांडली.

लोकशाहीर आण्णा भाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजना, नागरी दलित्तेर वस्ती सुधारणा योजना, महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान, दलित वस्ती पाणी योजना मधून चालू वर्षी कामे घेणे, संत शिरोमणी चोखामेळा समाधीचे संरक्षण होणे, रमाई आवास योजनेची अमंलबाजणी करणे, महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान योजनेच्या शिल्लक अनुदानातून नवीन कामे घेणे, जय भवानी कॉलनीत पाईपलाईन टाकणे, हिंन्दु स्मशानभूमीत विद्युत मोटर बसविणे सार्वजनिक शौचालयाजवळ गार्डनसाठी विद्युतीकरण करणे आदीसह अन्य विषय मंजूर करण्यात आले.

Web Title: due to contractor delay in work, the loss of the corporation