दुष्काळामुळे शेतकऱ्यांची हरभरा, गहू पिकांना पसंती

राजाराम माने
गुरुवार, 27 डिसेंबर 2018

केतूर (सोलापूर) : सध्या दुष्काळी परिस्थिती असल्याने शेतीसाठी पाणी टंचाई जाणवत आहे. आगामी काळात काळात ती आणखी उग्र रूप धारण करणार असेच चित्र आहे. पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर खरीप हंगामाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर मोकळे ठेवण्याऐवजी जिरायत भागातील शेतकऱ्यांनी पाण्याची उपलब्धता पाहून हरभरा पिकाला पसंती दिली आहे. तर बागायत भागातील शेतकऱ्यांनी हरभऱ्या बरोबरच गव्हाला पसंती देत ही पिके घेणे पसंत केले आहे. यावर्षी रब्बी हंगामाचा बार फुसका गेल्याने शेती पडीक पडली होती. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आला आहे. आता खरीपातही पाणीटंचाईचा सामना करीत हरभरा,गहू ही पीके शेतकऱ्याने मोठ्या धाडसाने घेतली आहेत.

हरभरा पिके एक-दोन पाण्यावर येते तर बागायत भागातील (उजनी लाभक्षेत्र परिसर) शेतकऱ्यांनी गव्हाची पेरणी मोठ्या प्रमाणात केली असल्याचे चित्र आहे.परिसरातील गव्हाचे पिक ही जोमदार आले आहे. काही शेतकऱ्यानी ऊस तोडणी झाल्यानंतर त्या शेतात अजूनही गव्हाची पेरणी करीत आहेत.गहू पेरणीचा हंगाम संपून गेला असला तरी शेतकरी गव्हाची पेरणी करीत आहे. हे विशेष उजनीचे पाणीही झपाटयाने उतरत असल्याने  गव्हालाही पाणी टंचाईची झळ बसण्याची भीती अनेक शेतकऱ्यानी "सकाळशी" बोलताना व्यक्त केली.
 
Web Title: Due to drought, farmers prefer wheat and gram crops