आटपाडी पश्चिमेस दुष्काळाचे सावट 

Due to drought in West Atpadi
Due to drought in West Atpadi

झरे : खरसुंडी मंडल मध्ये खरीप 26 गावे आहेत. या मंडल मध्ये ऑगस्ट अखेर 91 मिलीमीटर इतका पाऊस पडला आहे. सध्या खरसुंडी येथे पर्जन्यमापक यंत्र आहे. या यंत्राच्या सहाय्याने पाऊस किती पडला याचे मोजमाप केले जाते. खरसुंडीत पडलेल्या पावसाची आकडेवारी हि मंडल मधील 25 गावांना लागू होते. पण काही भागात पाऊस कमीजास्त पडतो. परंतु, शासनाकडे पर्जन्यमापक प्रमाणे आकडेवारी असते. हि बाब चुकीची असून प्रत्येक भागात पर्जन्यमापक यंत्र बसवावे अशी मागणी होत आहे.
 
सध्या खरसुंडी मंडल मध्ये ज्या गावांना टेंभू योजनेचा लाभ झाला आहे. त्या गावांची दुष्काळातून मुक्तता झाली आहे. पण ज्या गावांना टेंभू योजनेचा लाभ झाला नाही. त्या गावामध्ये पिके करपू लागली आहेत. विहिरी तलावाने तळ गाटला आहे. पावसाळ्यात हि अवस्था मग उन्हाळ्यात काय अवस्था होईल. शेतकऱ्यांनी मोठ्या जोमाने पेरणी केली पण पाऊस नसल्याने घातलेला खर्च निघत नाही. मग गुरे ढोरे जगवायची कशी असा गंभीर प्रश्न निर्माण झाले आहे.
 
खरसुंडी मंडल मध्ये जून, जुलै, ऑगस्ट अखेर पावसाची 91 मिलीमीटर नोंद झाली आहे. तर पेरणी सरासरी 50% झाली आहे. यामध्ये 
1. सरासरी क्षेत्र - 8644 हेक्टर, बाजरी पेरणी - 4674 हेक्टर, एकूण बाजरी पेरणी 54%.
2. सरासरी क्षेत्र - 4185 हेक्टर, मका पेरणी क्षेत्र - 1285 हेक्टर, मका 30% पेरणी, उडीद 63 हेक्टर, मुग 67 हेक्टर व इतर कडधान्ये 160 हेक्टर पेरणी झाली आहे.  
 
टेंभू योजने पासून वंचित गावातील पिके करपली खरीप वाया जाण्याच्या मार्गावर आहेत, विहिरी तलावाने तळ गाटल्याने पिण्याची पाण्याची अडचण भासणार आहे. गुरे-ढोरे जगविण्यासाठी स्थलांतर करावे लागणार आहे. तरी शासनाने उपाययोजना करावी अशी परिसरातून मागणी होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com