अतिवृष्टीमुळे कोल्हापुरातील "हे' 28 एसटी मार्ग बंद 

अतिवृष्टीमुळे कोल्हापुरातील "हे' 28 एसटी मार्ग बंद 

कोल्हापूर - अतिवृष्टीमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील 28 एसटी मार्ग बंद करण्यात आले आहेत, अशी माहिती परिवहन विभाग नियंत्रक रोहन पलंगे यांनी दिली. 

हे एसटी 28 मार्ग बंद

कोल्हापूर - गगनबावडा, संभाजीनगर - दोनोडे, इचलकरंजी - खिद्रापूर, गडहिंग्लज - नांगनूर, गडहिंग्लज - एैनापूर, गडहिंग्लज - कोवाड, गडहिंग्लज - निलजी, गारगोटी - कोल्हापूर, गारगोटी - तिट्टा, मलकापूर - रत्नागिरी, मलकापूर - बांबवडे, चंदगड - आजरा, चंदगड - बेळगाव, चंदगड - पारगड, चंदगड - इब्राहिमपूर, चंदगड - कुरणे/भूजवडे, कुरूंदवाड - बस्तवाड, कुरूंदवाड - लाट हेरवाड, कुरूंदवाड - दानोळी कवठेसार, कुरूंदवाड - टाकळी दानवाड, कुरूंदवाड-शिरोळ धरणगुत्ती, कुरुंदवाड - अकिवाट - राजापूर, कागल - बस्तवडे, कागल - बानगे, कागल - इचलकरंजी, राधानगरी - राशिवडे, राधानगरी - हळदी, गगनबावडा तालुक्‍यातील संपूर्ण एसटी वाहतूक बंद करण्यात आली आहे. 

कोल्हापूर - रत्नागिरी मार्गावर केर्ली रस्त्यावर पाणी आल्याने वाठार बोरपाडळी मार्गे पर्यायी वाहतुक सुरू आहे. कोल्हापूर - राजापूर मार्गावर आणुस्कूरा मार्गे वाहतूक बंद पर्यायी पाली मार्गे वाहतूक सुरू आहे. कोल्हापूर गगनबावडा मार्गावर मांडुकली/बालिंगा पुल रस्त्यावर पाणी आल्याने मार्ग पुर्णत: बंद आहे. कोल्हापूर - राधानगरी मार्गावर हळदी येथे रस्त्यावर पाणी आल्याने कुर्डू शेळेवाडी मार्गे वाहतूक सुरू आहे. 

संभाजीनगर - बाचणी रस्त्यावर पाणी आल्याने गिरगांव मार्गे वाहतूक सुरू. संभाजीनगर- दोनोडे रस्त्यावर पाणी आल्याने मार्ग पुर्णत: बंद आहे. 

इचलकरंजी - कागल मार्गावर माणकापूर येथे पाणी आल्याने पर्यायी पाच मैल मार्गे वाहतूक सुरू आहे. इचलकरंजी - कुरूंदवाड मार्गावर शिरढोण पुलावर पाणी आल्याने शिरढोणपर्यंत वाहतूक सुरू आहे. इचलकरंजी - कागल रस्त्यावर पाणी आल्याने हुपरीपर्यंत वाहतुक सुरू आहे. इचलकरंजी - खिद्रापूर रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक पुर्णत: बंद आहे. 

गडहिंग्लज -  नांगनूर मार्गावर निलजी पुलावर पाणी आल्याने वाहतूक पुर्णत: बंद आहे. गडहिंग्जल - ऐनापूर मार्गावर ऐनापूर येथे पाणी आल्याने वाहतूक पुर्णत: बंद आहे. गडहिंग्जल- कोवाड मार्गावर ऐनापूर येथे पाणी आल्याने वाहतू पुर्णत: बंद आहे. गडहिंग्जल-निलजी रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक पुर्णत: बंद आहे. गडहिंग्लज- आजरा मार्गावर बडगाव येथे पाणी आल्याने बवगाव पर्यंत वाहतूक चालू आहे. 

गारगोटी - कोल्हापूर मार्गावर कुर येथे पाणी आल्याने वाहतूक पुर्णत: बंद आहे. गारगोटी-तिट्टा मार्गावर मुरगूड येथे पाणी आल्याने वाहतूक पुर्णत: बंद आहे. गारगोटी-इस्फूर्ली मार्गावर बाचणी पूलावर पाणी आल्याने पर्यायी मु.तिट्टा मार्गे वाहतूक सुरू आहे. 

मलकापूर - रत्नागिरी रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक पुर्णत: बंद आहे. मलकापूर-बांबवडे मार्गावर सरूड येथे पाणी आल्याने वाहतूक पुर्णत: बंद आहे. 

चंदगड - आजरा मार्गावर जेऊर पुलावर खड्डा पडल्याने वाहतूक पुर्णत: बंद आहे. चंदगड-बेळगाव मार्गावर दाटे पुलावर पाणी आल्याने वाहतूक पुर्णत: बंद आहे. चंदगड-पारगड रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक पुर्णत: बंद आहे. चंदगड-इब्राहिमपूर रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक पुर्णत: बंद आहे. चंदगड-कुरणे/भूजवडे मार्गावर गवसे धरणावर पाणी आल्याने वाहतूक पुर्णत: बंद आहे. 

कुरूंदवाड - बस्तवाड मार्गावर बस्तवाड पुलावरपाणी आल्याने वाहतूक पुर्णत: बंद आहे. कुरूंदवाड-लाट हेरवाड मार्गावर हेरवाड येथे पुलावर पाणी आल्याने वाहतूक पुर्णत: बंद आहे. कुरूंदवाड- दानोळी कवठेसार मार्गावर कवठेसार पुलावर पाणी आल्याने वाहतूक पुर्णत: बंद आहे. कुरूंदवाड-टाकळी दानवाड मार्गावर दानवाड ओढ्यावर पाणी आल्याने वाहतूक पुर्णत: बंद आहे. कुरूंदवाड-शिरोळ धरणगुत्ती मार्गावर धरणगुत्ती रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक पुर्णत: बंद आहे. कुरूंदवाड-अकिवाट राजापूर मार्गावर राजापूर पुलावर पाणी आल्याने वाहतूक पुर्णत: बंद आहे. 

कागल-बस्तवडे मार्गावर बस्तवाड पुलावर पाणी आल्याने वाहतूक पुर्णत: बंद आहे. कागल- बानगे मार्गावर आनुर बानगे पुलावर पाणी आल्याने वाहतुक पुर्णत: बंद आहे. कागल-इचलकरंजी मार्गावर माणकापूर येथे पाणी आल्याने वाहतूक पुर्णत: बंद आहे. 

राधानगरी - राशिवडे मार्गावर पिरळ पुलावर पाणी आल्याने वाहतूक पुर्णत: बंद आहे. राधानगरी-हळदी मार्गावर हसुन येथे पाणी आल्याने वाहतूक पुर्णत: बंद आहे.  गगनबावडा मार्गावरील संपूर्ण वाहतूक पुर्णत: बंद आहे. आजरा-किट्टवडे रस्त्यावर पाणी आल्याने घाटकरवाडी पर्यंत वाहतूक सुरू आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com