अतिवृष्टीमुळे बेळगाव जिल्ह्यातील शाळांना दोन दिवस सुट्टी जाहीर    

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 ऑगस्ट 2019

बेळगाव - मुसळधार पाऊस आणि पुलांवर आलेल्या पाण्यामुळे बेळगाव जिल्ह्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. बेळगाव  व चिक्कोडी शैक्षणिक जिल्ह्यातील (रामदुर्ग तालुका वगळता) सर्व शाळांना मंगळवार (ता. 6) व  बुधवारी (ता. 7) सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. 

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार पावसाचा जोर कायम राहणार आहे.  त्यामुळे शाळांना सुट्टी देण्यात येत आहे. शाळेला सुट्टी असल्याचा संदेश विद्यार्थी व पालकांपर्यंत वेळीच पोहचवण्यात यावा, अशी सूचना शिक्षण खात्यातर्फे देण्यात आली आहे.

नागपंचमी असल्याने सोमवारी अनेक शाळांना स्थानिक सुट्टी देण्यात आली आहे. सकाळी चिक्कोडी शैक्षणिक जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. फक्त रामदुर्ग तालुक्यात पावसाचा जोर कमी असल्याने तेथील शाळा सुरू राहणार आहेत,  अशी माहिती देण्यात आली आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Due to heavy rains, schools in Belgaum district have been declared a holiday for two days