पुरस्थितीमुळे सांगली परिवहनचे 'हे' मार्ग बंद

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 ऑगस्ट 2019

सांगली विभागातील सहा गावांतील एसटीच्या फेऱ्या बंद करुन अलिकडील गावापर्यंत सुरु ठेवण्यात आल्याची माहिती परिवहन विभागातून देण्यात आली.

सांगली - चांदोली धरण परिसरातील सलग पाचव्या दिवशी अतिवृष्टी, कोयना पाणलोट क्षेत्रातील पावसाची संततधार यामुळे वारणा - कृष्णा नद्यांची पाणीपातळी वाढते आहे. प्रशासनाने लोकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. सांगली विभागातील सहा गावांतील एसटीच्या फेऱ्या बंद करुन अलिकडील गावापर्यंत सुरु ठेवण्यात आल्याची माहिती परिवहन विभागातून देण्यात आली.

अतिवृष्टीमुळे सांगली एसटीचे हे मार्ग बंद

  • इस्लामपूर ते वारणानगर फेरी ऐतवडे खुर्द पर्यंत सुरू (ऐतवडे पुलावर पाणी),
  • इस्लामपूर ते करंजवडे फेरी डोंगरवाडीपर्यंत सुरू (मांगले पुलावर पाणी),
  • इस्लामपूर ते जुनेखेड फेरी नवेखेड पर्यंत (जुनेखेड ओढ्याला पाणी),
  • शिराळा ते कांडवन फेरी आरळापर्यंत सुरू (सोंडोली पुलावर पाणी)

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Due to heavy rains, this ST route closed in Sangli