अनुदान उशाला कोरड घशाला

महेश पाटील
रविवार, 14 एप्रिल 2019

सलगर बुद्रूक, (जिल्हा सोलापूर) : दुष्काळाची गंभीर दखल घेऊन राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी जाहिर केलेले सरसकट दुष्काळी अनुदान गेल्या दीड महिन्यापासून बँकेत इंटरनेट सुविधा सुरु नसल्याने शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेले नाही. हा प्रकार सलगर बुद्रूक येथील विदर्भ कोकण ग्रामीण बँकेकढून झाला आहे. त्यामुळे शेतकरी संतप्त झाले आहेत. महसूल विभागाकढून दीड महिन्यापूर्वीच दुष्काळी अनुदानाच्या याद्या विदर्भ कोकण बँकेस प्राप्त झाल्या आहेत असे महसूल विभागामार्फत सांगण्यात आले होते. मग बँकेकढून याद्या शेतकऱ्यांच्या खात्यावर का जमा केल्या नाहीत या विषयी शंका कुशंका निर्माण होत आहेत.

सलगर बुद्रूक, (जिल्हा सोलापूर) : दुष्काळाची गंभीर दखल घेऊन राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी जाहिर केलेले सरसकट दुष्काळी अनुदान गेल्या दीड महिन्यापासून बँकेत इंटरनेट सुविधा सुरु नसल्याने शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेले नाही. हा प्रकार सलगर बुद्रूक येथील विदर्भ कोकण ग्रामीण बँकेकढून झाला आहे. त्यामुळे शेतकरी संतप्त झाले आहेत. महसूल विभागाकढून दीड महिन्यापूर्वीच दुष्काळी अनुदानाच्या याद्या विदर्भ कोकण बँकेस प्राप्त झाल्या आहेत असे महसूल विभागामार्फत सांगण्यात आले होते. मग बँकेकढून याद्या शेतकऱ्यांच्या खात्यावर का जमा केल्या नाहीत या विषयी शंका कुशंका निर्माण होत आहेत. शिवाय या परिसरातील बाकीच्या सर्व राष्ट्रीयकृत बँकांमध्ये महिन्याअधीच दुष्काळी मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली आहे.

दरम्यान गेल्या ऑक्टोबर महिन्यापासूनच दुष्काळी परिस्थिती मुळे शेतकरी वर्ग हैराण झाला आहे. दुष्काळात शेतकऱ्यांना मदत व्हावी या हेतूने शासनाने जाहीर केलेले दुष्काळी अनुदान दुष्काळ संपल्यावर मिळणार काय असा प्रश्न शेतकरी वर्गातून विचारला जात आहे. गेल्या वर्षभरापासून सलगर मधील विदर्भ कोकण बँक या ना त्या कारणाने चर्चेत येत आहे. बँकेकढून सामान्य बँक ग्राहकांना कायम चालढकलीची वासगणूक मिळत आहे. याबाबत वरिष्ठ विभागाला कळवून सुद्धा कांहीच कारवाही होत नसल्याने सलगर मधील शेतकऱ्यांच्या मनात संतापाची लाट आहे.

मी गेली महिनाभर विदर्भ कोकण बँकेत दुष्काळी मदत काढण्यासाठी हेलपाटे घालतो आहे. त्यांनी आद्यापपर्यंत दुष्काळी मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली नाही. उलट पक्षी बँकेतील अधिकारी आमच्याशी अद्धट बोलत आहेत. वरिष्ठ विभागामार्फत चौकशी होऊन हलगर्जी पना करणाऱ्या शाखाधिकाऱ्यावर कार्यवाही व्हावी अशी आमची मागणी व्हावी. 
- आबा शिंदे, शेतकरी सलगर बुद्रूक 

आम्ही सदर बँकेला पत्र पाठवणार असून डिझास्टर मॅनेजमेंट एक्त अंतर्गत बँकेवर कारवाही का करू नये असा खुलासा आम्ही बँकेकडून मागवणार आहोत. व त्यात दोषी आढळून आल्यास आम्ही कार्यवाही करणार आहोत.
- स्वप्नील रावडे, तहसीलदार मंगळवेढा

बँकेत कनेक्टिव्हिटी नसल्याने दुष्काळी अनुदान जमा केले नाही. जसजशी कनेक्टिव्हिटी येईल तसतसे जमा करत जाणार आहे.
- संतोष वानखेडे, शाखाधिकारी वि.को.ग्रामीण बँक शाखा सलगर बुद्रूक

Web Title: Due to Lack of Internet Service Farmers did not get Subsidy