फाटक्या नोटा मिळाल्यामुळे एटीएमच्या शटरलाच लावले कुलुप 

चंद्रकांत देवकते
सोमवार, 27 ऑगस्ट 2018

मोहोळ येथील बँक ऑफ इंडियाच्या ए. टी. एम. मधून निघालेल्या फाटक्या नोटा बदलुन मिळाव्यात व संबधित एजन्सीवर कारवाई करावी. यासाठी दलित स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी ए. टी. एम. च्या शटरलाच शनिवार ता. २५ ला कुलुप लावले होते.
 

मोहोळ (जि. सोलापूर) - घटनात्मक हक्काच्या अधिकाराचा वापर करीत न्याय मागत असताना त्याच घटनेने जनतेलाही दिलेल्या अधिकाराचा विसर पडता कामा नये असे मत पोलिस निरीक्षक सुर्यकांत कोकणे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केले. मोहोळ येथील बँक ऑफ इंडियाच्या ए. टी. एम. मधून निघालेल्या फाटक्या नोटा बदलुन मिळाव्यात व संबधित एजन्सीवर कारवाई करावी. यासाठी दलित स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी ए. टी. एम. च्या शटरलाच शनिवार ता. २५ ला कुलुप लावले होते.

हे कुलुप पो. नि. कोकणे यांनी कायदयाचा बडगा दाखवित काढण्यास भाग पाडले. याबाबत पो. नि. कोकणे यांनी वैयक्तिक लक्ष घालून संबधित ए. टी. एम. हे महामार्गावर आहे. ते बंद असल्याने वाहनधारकांची नागरिकांची अडचण होत आहे. तुमचे म्हणणे बँक व्यवस्थापकाकडे रितसर मांडा व न्याय मिळवुन घ्या! सर्वसामान्य नागरिकांना विनाकारण होणारा त्रास खपवून घेतला जाणार नाही. अन्यथा अशा चुकीच्या पद्धतीने बेकायदेशीरपणे न्याय मागणाऱ्यास इथुन पुढील काळात कायदयाच्या चौकटीतच कारवाई करण्यात येईल असे सांगितले. पो. नि. कोकणे यांचे म्हणण्यास प्रतिसाद देत दलित स्वयंसेवक संघाचे जिल्हाध्यक्ष युवराज सकट यांनी ए. टी. एम. ला लावलेले कुलुप उघडले. परिणामी पो. नि. सुर्यकांत कोकणे यांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे नागरिकांची अडचण दुर झाली असल्याने नागरिकातून समाधान व्यक्त होत आहे.

Web Title: Due to the notes in bad condition received from ATM shutter locked by people