ओव्हरलोड टिपरच्या धडकेने अडीच वर्षाच्या चिमुकल्याचे निधन  

चंद्रकांत देवकते
गुरुवार, 17 मे 2018

मोहोळ (सोलापूर) - आई व आजीसह रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगाने जाणाऱ्या ओव्हरलोड वाळूच्या टिपरने जोरदार धक्का दिल्याने गंभीर जखमी होऊन अडीच वर्षाच्या मुलाचा मृत्यु झाला. 16 मे रोजी सायं सहा वाजण्याच्या दरम्यान मोहोळ येथील कन्या प्रशाला चौकात घडली.

याबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहीती नुसार, कडलास ता. सांगोला येथे राहणाऱ्या स्वप्ना दिनेश बंडगर या मोहोळ येथे आठवडयापूर्वी आपल्या माहेरी आल्या होत्या. गाढवे वस्तीवर त्यांचे आईवडील राहतात. त्या  कामानिमीत्त बुधवार ता .१६ रोजी आई वंदना फंटू धायगुडे यांच्या सह शहरात आल्या होत्या. आपले काम आटोपून स्वप्ना वंदनासोबत मुलगा कार्तीकला घेऊन कन्या प्रशाला चौकातुन रस्ता ओलांडत असताना उस्मानाबाद कडे भरधाव वेगाने जाणाऱ्या टिपरने वाहनाने धक्का दिल्याने अडीच वर्षीय कार्तीक हा खाली पडला. व त्यांच्या दोन्ही मांडयावरून टिपरचे चाक गेल्याने चिमुकला कार्तीक गंभीर झाला. तर त्याची आई स्वप्ना ही किरकोळ जखमी झाली. अडीच वर्षाच्या कार्तीकला तात्काळ सोलापूर येथे उपचारासाठी घेऊन जात असताना प्रचंड रक्तस्त्राव झाल्याने त्याचा मृत्यु झाला.

याबाबत टिपरचा ड्रायव्हर अमोल मारूती नाईकवाडी (वय ३४ ) रा . कोंडगांव जि उस्मानाबाद याच्यावर मोहोळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास मोहोळ पोलिस करीत आहेत. 

Web Title: Due to the overloaded tipper boy killed in a accident