सकाळच्या पाठपुराव्यामुळे इंदापूर तालुक्यातील वाघाळे तलावामध्ये पाणी...

राजकुमार थोरात
शनिवार, 20 ऑक्टोबर 2018

वालचंदनगर - ‘सकाळ’ माध्यम समुहाने इंदापूर तालुक्यातील वाघाळे तलावामध्ये पाणी सोडण्यासाठी केलेल्या पाठपुराव्यामुळे शुक्रवार (ता.१९)च्या रात्रीपासुन तलावामध्ये पाणी सोडण्यास सुरवात करण्यात आली आहे. तलावामध्ये पाणी आल्यामुळे  निरवांगी, दगडवाडी व सराफवाडी या गावातील पिण्याच्या व जनावरांच्या पाण्याचा प्रश्‍न मार्गी लागणार आहे. 

वालचंदनगर - ‘सकाळ’ माध्यम समुहाने इंदापूर तालुक्यातील वाघाळे तलावामध्ये पाणी सोडण्यासाठी केलेल्या पाठपुराव्यामुळे शुक्रवार (ता.१९)च्या रात्रीपासुन तलावामध्ये पाणी सोडण्यास सुरवात करण्यात आली आहे. तलावामध्ये पाणी आल्यामुळे  निरवांगी, दगडवाडी व सराफवाडी या गावातील पिण्याच्या व जनावरांच्या पाण्याचा प्रश्‍न मार्गी लागणार आहे. 

इंदापूर तालुक्यातील निरवांगी, दगडवाडी व सराफवाड या तीन गावांच्या पिण्याच्या पाण्याच्या योजनेच्या विहिरी वाघाळे तलावालगत आहे. तलावामध्ये पाणी असल्यास या गावातील पिण्याच्या व जनावरांच्या पाण्याचा प्रश्‍न कमी होत असतो.चालू वर्षी पावसाळाने इंदापूर तालुक्याकडे पाठ फिरवल्यामुळे तलाव कोरडा राहिला होता. यामुळे तिन्ही गावातील पिण्याच्या पाण्याच्या योजना बंद पडण्याच्या मार्गावरती होता.तिन्ही गावतील ग्रामस्थ ऑगस्ट महिन्यापासुन तलावामध्ये पाणी सोडण्याची मागणी करत होते. मात्र जिल्हाधिकारी कार्यालय व पाटबंधारे विभाग पाणी सोडण्यास चालढकल करीत होते.यासंदर्भात ग्रामस्थांनी पत्रकार परिषद घेवून पाणी सोडण्याची मागणी केली. सकाळ माध्यम समुहाने १८ ऑक्टोबर व १९ ऑक्टोबर रोजी इंदापूर च्या तीन गावामध्ये पाणीबाणी या मथळखाली बातमी छापून तातडीने पाणी सोडण्याची मागणी करुन कालव्याने पाणी सोडल्यास येणारा खर्च व ट्रॅंकरद्वारे पाणी पुरवठा केल्यास येणाऱ्या खर्चामधील फरक दाखविला होतो.बातमी प्रसिद्ध होताच पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी गुरुवार (ता.१८) रोजी रात्री आठ वाजता तातडीने बैठक घेवून पाणी सोडण्याचे नियोजन केले. व शुक्रवार (ता.१९) रोजी रात्रीच्या वेळी तलावामध्ये पाणी सोडण्यास सुरवात केली आहे. तलावामध्ये पाणी आल्यामुळे ग्रामस्थामध्ये आनंदाचे वातावरण आहे.

सकाळचे मानले आभार..
सकाळच्या पाठपुराव्यामुळे तलावामध्ये पाणी आल्यामुळे निरवांगी, दगडवाडी, सराफवाडी ग्रामस्थांनी सकाळचे आभार मानले असल्याचे माजी सरपंच दशरथ नंदू पोळ यांनी सांगितले.

खासदार सुप्रिया सुळेंनी ही केले प्रयत्न...
निरवांगी, दगडवाडी व सराफवाडी गावातील ग्रामस्थांनी वाघाळे तलावामध्ये पाणी सोडण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांची शुक्रवार (ता.१९) रोजी इंदापूर मध्ये भेट घेतली होती. सुळे यांनीही तातडीने जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधून पाणी सोडण्याची मागणी केली होती.

Web Title: Due to Sakal's follow up, water in Waghale lake in Indapur taluka