शॉटसर्किटमुळे एक एकर ऊस जळून खाक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 जून 2018

तालुक्‍यातील बहिरोबावाडी येथे भाऊसाहेब देविदास रानमाळ यांच्या शेतातील एक एकर ऊस शॉर्टसर्किटमुळे जळून खाक झाला. यामध्ये सुमारे सव्वा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. 

कर्जत - तालुक्‍यातील बहिरोबावाडी येथे भाऊसाहेब देविदास रानमाळ यांच्या शेतातील एक एकर ऊस शॉर्टसर्किटमुळे जळून खाक झाला. यामध्ये सुमारे सव्वा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. 

बहिरोबावाडी (ता. कर्जत) येथे भाऊसाहेब रानमाळ यांच्या शेतातून वीजवाहक तारा गेल्या असून, शेतात टॉन्सफॉर्मर आहे. तो तेथून हलविण्यात यावा, अशी मागणी अनेकदा केली आहे. परंतु, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. महावितरणाचा हलगर्जी कारभार व निष्काळजीपणामुळे उसाच्या शेतात आग लागली. 

रानमाळ यांचे सुमारे सव्वा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. महावितरणने त्यांना त्वरित नुकसान भरपाई द्यावी, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सरपंच विजय तोरडमल व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते दीपक शिंदे यांनी दिला आहे. 

महावितरणच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली असून, संबंधित शेतकऱ्याला भरपाई देण्याबाबत कार्यवाही करण्यात येईल. असे महावितरणचे उपकार्यकारी अभियंता उमाकांत खोंडे यांनी सांगितले.

Web Title: due to Shotcircuit burns one acre of sugarcane