वादळी वाऱ्यामुळे मोहोळ येथे शेतीचे नुकसान

राजकुमार शहा
बुधवार, 18 एप्रिल 2018

शेटफळ मंडळातील आष्टी, येवती, बैरागवाडी, कुरणवाडी, सिद्धेवाडी, तेलंगवाडी आदी गावातील शेतकऱ्यांच्या शेवगा, केळी, डाळींब या बागांचे मोठे नुकसान झाले आहे.

मोहोळ - मंगळवार ता. 17 ला मोहोळ शहरासह तालुक्यात झालेल्या वादळी वारे व विजेमुळे शेटफळ मंडळात सर्वात जास्त म्हणजे 50 लाख रुपयांचे फळबागांचे नुकसान झाले असून नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिल्याची माहिती प्रभारी तहसीलदार किशोर बडवे यांनी दिली.

मंगळवारी दिवसभर वातावरण ढगाळ होते सायंकाळी अचानक जोरदार वादळाला सुरुवात झाली. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. देवडी ता. मोहोळ येथील शेतात असलेल्या विठ्ठल थोरात यांच्या गायीच्या अंगावर वीज पडून गायीचा मृत्यु झाला. तर शेटफळ मंडळातील आष्टी, येवती, बैरागवाडी, कुरणवाडी, सिद्धेवाडी, तेलंगवाडी आदी गावातील शेतकऱ्यांच्या शेवगा, केळी, डाळींब या बागांचे मोठे नुकसान झाले आहे. तर जुनी आंब्याची झाडे उन्मळून पडली आहेत. सुमारे 50 हजार हेक्टर क्षेत्रावरील फळबागेचे नुकसान झाले असल्याचा नजर अंदाज मंडळ अधिकारी बीबीषण वागज यांनी सांगितले.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Due to the storm the loss of agriculture in Mohol