काटेकोर नियोजनामुळे कोयनेत २७.३६ टीएमसी पाणीसाठा शिल्लक

काटेकोर नियोजनामुळे कोयनेत २७.३६ टीएमसी पाणीसाठा शिल्लक

पाटण : वीजनिर्मीती, सिंचन, पिण्याचे पाणी  अशा सर्व पातळीवर महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोयना धरणाने १ जुन २०१७ ते ३१ मे २०१८ असे जलवर्ष पुर्ण केले आहे. धरणात आज २७.३६ टीएमसी पाणीसाठा शिल्लक असुन गतवर्षीच्या तुलनेत १०.१४ टीएमसी जादा पाणीसाठा आहे. नविन जल वर्षासाठी कोयना धरण पुन्हा सज्ज झाले आहे. आवश्यकता फक्त आता मान्सुनच्या दमदार पावसाची आहे.

जलवर्ष २०१७-१८ मध्ये मोठ्याप्रमाणावर पाण्याचा वापर झाला होता. सिंचन व वीजनिर्मीती आणि कर्नाटकला दुष्काळ परिस्थितीसाठी ३.१८ टीएमसी पाणी सोडल्याने धरणाच्या पाण्याने तळ गाठला होता. त्यामुळे एक हजार मेगावॅटचा चौथा टप्पा ३५ दिवस बंद होता. १ जुन रोजी गतवर्षी १९.०८ टीएमसी पाणीसाठा होता. जुनचा पहिला आठवडा सोडला तर मान्सुनच्या पावसाने ओढ दिल्याने भीषण पाणीटेचाईला सामोरे जावे लागेल असे चित्र होते. मात्र, २८ जुनला दमदार मान्सुनचे आगमन झाले व त्यात सातत्य राहिल्याने धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होऊन पाणीसाठा नियंत्रणासाठी ३० जुलैला सकाळी धरणातुन पाणीसोडण्यास सुरुवात करण्यात आली होती. 

सप्टेंबर अखेर पावसाचा जोर कायम राहिल्याने पाणीसाठा नियंत्रीत करण्यासाठी अनेक वेळा पाणी सोडूनही काटेकोर नियोजनामुळे धरण पुर्ण क्षमतेने भरले होते. पश्चिमेकडे वीजनिर्मीतीसाठीजलवर्षात लवादाप्रमाणे ६७.५० टीएमसी पाण्याचा वापर करण्यात येतो. यावर्षी मात्र हा कोटा पुर्ण क्षमतेने वापरला आहे. तसेच पुर्वेकडे सिंचन व पिण्याच्या पाण्यासाठी कोयनानदी पात्रात २८ टीएमसी पाणी वापर झाला आहे. जलवर्ष ३१ मे रोजी संपले त्यावेळी धरणात २९.४० टीएमसी पाणीसाठा होता.
 
वीजनिर्मीती, सिंचन, पिण्याचे पाणी असा योग्य वापर होऊनही काटेकोर नियोजनामुळे धरणात आज २७.३६ टीएमसी पाणीसाठा आहे. गतवर्षी तो फक्त १७.२२ टीएमसी होता.

केरळ पाठोपाठ कोकणात मान्सुनचे दमदार आगमन झाले असुन पाटण तालुक्यात पाऊस हजेरी लावु लागला आहे. गेली दोन दिवस कोयना धरण पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस पडत आहे. गेल्या २४ तासात कोयनानगरला ३५ मिलीमीटर, नवजाला २७ मिलीमीटर व महाबळेश्र्वरला ६२ मिलीमीटरपावसाची नोंद झाली आहे.

गतवर्षाचा विचार करता धरणातील पाणीसाठा दहा टीएमसी जादा असल्याने व नविन जलवर्षास सुरुवात झाल्याने कोयना धरण आजच्या स्थितीला पाणीसाठ्याच्या बाबतीत मजबुत स्थितीत आहे त्यामुळे काळजी करण्याचे कारण नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com