तांत्रिक चुकीमुळे...!

Due to a technical error ...!
Due to a technical error ...!

नगर : "सकाळ'मधून आज प्रकाशित झालेल्या "परीक्षेआधीच निकाल' या बातमीमुळे न्यू आर्टस महाविद्यालयाच्या प्रशासकीय यंत्रणेची धावपळ उडाली. निकाल घोषित करण्याची जबाबदारी असलेल्या यंत्रणेची यात तांत्रिक चूक झाल्याने हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील बीएस्सी व एमएस्सी ऍनिमेशन अभ्यासक्रमाच्या परीक्षा विभागास न्यू आर्टस महाविद्यालयातून तातडीने विद्यार्थ्यांची अडचण व "सकाळ'मधील बातमी ई-मेलद्वारे पाठविण्यात आली. त्याची दखल घेऊन विद्यापीठातील यंत्रणेनेही तत्काळ दुरुस्तीचे काम सुरू केल्याचे सूत्रांनी सांगितले. 


परीक्षा... जी दिलीच नाही, तिचा निकाल आल्याने जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या न्यू आर्टस महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी काल डोक्‍याला हात लावला. परीक्षेच्या सहा महिने आधीच दुसऱ्या सत्राचे गुणदान करण्याची अफलातून किमया यातून साधली गेली. विशेष म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना हे गुणदान झाले, त्या ऍनिमेशन विभागाचे प्रमुखच त्याबाबत अनभिज्ञ असल्याने आश्‍चर्य व्यक्त होत होते. त्याबाबतचे वृत्त आज "सकाळ'मध्ये प्रकाशित झाले. त्या बातमीचे महाविद्यालयातील सर्वच विभागांत वाचन झाले. तथापि, या प्रकारास महाविद्यालयाची यंत्रणा नव्हे, तर विद्यापीठातील परीक्षा विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची तांत्रिक चूक असल्याचे आज निदर्शनास आले. 

त्यात आज सकाळीच या संदर्भातील अडचणीचा मेल सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील बीएस्सी व एमएस्सी ऍनिमेशन परीक्षा विभागास पाठविण्यात आला आहे. त्याची तेथे तातडीने दखल घेऊन दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. तथापि, शनिवारी व रविवारी सुटीचा दिवस असल्याने हे काम पूर्ण होण्यास दोन दिवस लागतील, अशी माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, विद्यापीठातील बीएस्सी व एमएस्सी ऍनिमेशन परीक्षा विभागाच्या सूत्रांनी ही तांत्रिक चूक असल्याची माहिती दिली. ती तातडीने दुरुस्त करण्याचे काम सुरू केल्याचे त्यांनी सांगितले. 

दुरुस्तीचे काम सुरू

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील एमएस्सी व बीएस्सी परीक्षा विभागातील कर्मचाऱ्यांच्या तांत्रिक चुकीमुळेच बीएस्सी ऍनिमेशन अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या निकालात अडचण निर्माण झाली होती. तथापि, त्यात दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले असून, विद्यार्थ्यांना पुन्हा ऑनलाइन पद्धतीने तातडीने निकालपत्र देण्याचे काम सुरू केले आहे. त्या संदर्भात विद्यापीठातील संबंधित यंत्रणेशी बोलणे झाले आहे. 
- डॉ. बी. एच. झावरे, 
प्राचार्य, न्यू आर्टस, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालय, नगर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com