कोगनोळीत वळीव पावसामुळे आठवडी बाजारात तारांबळ

जोरदार वारा, विजेचा कडकडाट, गारांचा मारा यामुळे या शेतातील पिकांचे चे मोठे नुकसान
rains Kognoli market
rains Kognoli market sakal

कोगनोळी : येथे व परिसरात शुक्रवारी (ता. ८) वळीव पावसाने दमदार हजेरी लावली. जोरदार वारा, विजेचा कडकडाट, गारांचा मारा यामुळे या शेतातील पिकांचे चे मोठे नुकसान झाले. पावसामुळे शुक्रवारच्या येथील आठवडी बाजारात तारांबळ उडाली. सुमारे दोन तास झालेल्या या पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले होते.गेले दोन-तीन दिवसापासून पावसाने हुलकावणी दिली होती. शुक्रवारी दिवसभर कडक उन्ह जाणवत होते.

दुपारी चारच्या सुमारास अचानक ढग जमून येऊन विजेचा कडकडाट व जोरदार वाऱ्यासह वळीव पावसाने दमदार हजेरी लावली. अचानक सुरू झालेल्या या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. कोगनोळी येथील शुक्रवारी आठवडी बाजार असल्याने आसपासच्या खेड्यातील शेकडो शेतकरी आपल्या शेतातील पालेभाज्या घेऊन आले होते. पण सुरू झालेल्या पावसामुळे शेतकरी, व्यापारी यांचे मोठे नुकसान झाले. दमदार पावसामुळे रस्त्यावर पाणीच पाणी झाले होते. तर गटारी तुडुंब भरून वाहू लागल्या होत्या. येथील मुख्य बाजारपेठेत या पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात आल्याने अनेक व्यापाऱ्यांच्या भाज्या वाहून जात होत्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com