"सिग्नल'मुळे वाहतुकीला शिस्त 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 मार्च 2017

कोल्हापूर - सायबर, हॉकी स्टेडियम, संभाजीनगर, गोखले कॉलेज येथील चौकातील सिग्नल नियमित सुरू राहिल्यामुळे वाहतुकीला शिस्त लागत आहेत. रिंग रोडवर पोलिस नसतानाही वाहनधारक केवळ सिग्नलमुळे शिस्त पाळत आहेत. शहरातील सर्वच सिग्नल सुरळीत झाल्यास शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांना शहरातील गर्दी आणि पार्किंगवर अधिक लक्ष देता येणार आहे. 

शहरातील वाहतुकीला शिस्त लागली पाहिजे म्हणणारेही सुविधा नसल्यामुळे नियमाचे उल्लंघन करत असल्याचे दिसून येते. हाच धागा पकडून वाहतूक पोलिसांनी रिंग रोडवरील आणि उपनगरातील सिग्नल नियमित सुरू केले. त्याचा "रिझल्ट' आता दिसत आहे. चौकात कोणीही पोलिस नसला तरी तेथे वाहनधारकांकडून शिस्त पाळली जात आहे. पोलिस आहे की नाही हे न पाहता वाहनधारक "झेब्रा क्रॉसिंग'च्या मागे उभे राहतात. सुविधा दिल्या तर वाहनधारकांकडूनही त्याचे पालन होते हे यावरून स्पष्ट झाले. याचबरोबर चेन स्नॅचिंग सारखे प्रकार कमी झाले आहेत. सिग्नल सुरू असल्यामुळे पळून जाणाऱ्या चोरट्यांना वेगाने जाण्यावर मर्यादा येतात. केवळ सिग्नल सुरू असल्यामुळे चोरट्यांवर नियंत्रण राहत आहे. 

शहरातील सर्वच सिग्नल सुरू राहिल्यास वाहतूक शाखेच्या पोलिसांवरील ताण आणखी कमी होणार आहे. परिणामी त्यांना शहरातील प्रमुख ठिकाणी होणाऱ्या पार्किंग समस्येवर विशेष लक्ष देता येणार आहे. रंकाळा टॉवर, महालक्ष्मी मंदिर, बिंदू चौक, लक्ष्मीपुरी जुना कांदा बटाटा मार्केट, शाहूपुरीतील बी. टी. कॉलेज परिसर येथे विशेष लक्ष देता येणार आहे. त्यामुळे शहरातील सर्व सिग्नल सुरू करून तेथे झेब्रा क्रॉसिंगचे पट्ट्यांची व्यवस्था महापालिकेने करणे गरजेचे आहे. 

Web Title: Due to traffic discipline signal