मोहोळ पंचायत समितीतील रिक्त पदांमुळे विकासाला खीळ

मोहोळ पंचायत समितीतील रिक्त पदांमुळे विकासाला खीळ

मोहोळ- मोहोळ तालुका पंचायत समितीच्या अधिपत्याखाली काम करणाऱ्या विविध विभागातील तब्बल 163 पदे रिक्त आहेत, त्यामुळे तालुक्याच्या विकासाला खीळ बसली आहे. विषेश म्हणजे या रिक्त जागात आरोग्य व शिक्षण खात्याचा उच्चांक आहे. तालुक्याच्या विविध भागातुन कामासाठी येणाऱ्या सर्वसामान्य नागरीकाला याचा मोठा फटका बसत असून त्याचा वेळ व पैसा मोठ्या प्रमाणात वाया जात आहे. त्यामुळे मोठी नाराजी व्यक्त होत आहे.

पंचायत समिती म्हणजे तालुक्याच्या विकासाचा केंद्र बिंदु असते. ग्रामीण माणसांची नाळ विविध कामासाठी जुळलेली असते. संबंधीत विभागाचा माणुस उपलब्ध नसल्याने नागरिकांना हेलपाटे मारावे लागतात. पंचायत समितीच्या बांधकाम विभागातील सहा पदे रिक्त आहेत यामुळे घरकुलांचे मोजमाप, बीले, विविध देयके, विविध प्रस्ताव ही कामे वेळेत होत नाहीत. सध्या शहरासह ग्रामीण भागात वातावरण बदलामुळे स्वाईनफ्लु सदृष्य वातावरण आहे .थंडी, ताप, खोकला या आजारात वाढ झाली आहे. तालुक्यातील शिरापुर, पाटकुल, अनगर, शेटफळ, नरखेड, कामती, बेगमपुर, अंकोली, कुरूल या प्राथमिक आरोग्य केंद्रातील विविध तब्बल 51 जागा रिक्त आहेत. यामुळे लसीकरण, साथीच्या रोगांचे आजार, यावर वेळेत उपचार होत नाहीत अडचणी येतात.

भावी पिढी घडविण्याची ज्यांच्यावर जबाबदारी आहे अशा शिक्षण विभागातील तब्बल 82 जागा रिक्त आहेत, त्यात चाळीस मुख्याध्यापक, बावीस पदवीधर शिक्षक तर एकोणीस उपशिक्षकांचा समावेश आहे. यामुळे शाळेवर नियंत्रण राहात नाही, तर याचा मोठा परिणाम गुणवत्तेवर होत आहे. यासह प्रशासन विभाग, कृषी विभाग, यातील एक दोन जागा रिक्त आहेत. ग्रामपंचायत विभागातील दहा पदे रिक्त आहेत, त्यात ग्रामाविकास अधिकारी, ग्रामसेवक यांचा समावेश आहे. ही पदे रिक्त असल्याने मोठ्या गावासह लहान लहान गावांच्या विकासावर थेट परिणाम होत आहे. दाखले वेळेत न मिळणे, विविध प्रस्ताव देणे या कामांची अडचण होत आहे. एकात्मिक बालविकास प्रकल्प, जलसंधारण, पशुसंवंर्धन आदी विभागातील ही पदे रिक्त आहेत. यामुळे तालुक्याच्या विकासावर मोठा परिणाम होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com