परीक्षेत बसवले "डमी' अन 

dummy student in typing exam
dummy student in typing exam

नगर : कोणत्याही परीक्षेत डमी बसवण्याची मानसिकता अद्यापि कमी झालेली नाही. नगरमध्ये झालेल्या टंकलेखनाच्या परीक्षेतही हा प्रकार उघडकीस आला. नेप्ती येथील छत्रपती शिवाजी महाराज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये मराठी विषयाच्या संगणक- टंकलेखन परीक्षेत चार "डमी' विद्यार्थी आढळून आले. तोफखाना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. ज्यांच्यासाठी हे आरोपी "डमी' बसले होते, त्यांच्यासह आठ जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. 

संतोष मारुती चौरे (रा. नगर), आदिनाथ नामदेव सोलट, नवनाथ नामदेव सोलट (रा. मिरी, ता. पाथर्डी), युवराज रामदास सुळे (रा. पाटोदा, जि. बीड) यांना अटक करण्यात आली आहे. मयूर चंद्रकांत घोडके, मोरेश्‍वर दिलीप गिते, तेजस जालिंदर बोरुडे, प्रवीण अर्जुन गाडेकर (रा. नगर) हे पसार झाले. त्यांतील आरोपी संतोष चौरे श्रीरामपूर न्यायालयात कार्यरत असून, तो एका टंकलेखन इन्स्टिट्यूटचा संचालकही आहे. 


असा झाला भांडाफोड 
राज्यात सध्या संगणक- टंकलेखनाची परीक्षा सुरू आहे. नेप्ती येथील छत्रपती शिवाजी महाराज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग केंद्रावर मराठीची संगणक- टंकलेखन परीक्षा सुरू होती. या केंद्रावर संचालक म्हणून जयश्री कार्ले होत्या. परीक्षा हॉलमध्ये काही विद्यार्थ्यांचा संशय आल्याने कार्ले यांनी त्यांची ओळखपत्रे तपासली, तसेच स्वाक्षरी तपासली असता, चार विद्यार्थी "डमी' असल्याचे आढळून आले. याबाबत विचारणा केली असता, बनावट विद्यार्थ्यांनी उलट कार्ले यांनाच अरेरावी केली. 

डमीने दिली कबुली 
कार्ले यांनी या प्रकाराची माहिती वरिष्ठांना दिली. त्यानुसार केंद्रावर बंदोबस्तासाठी पोलिसांना बोलाविण्यात आले. पोलिसांनी चारही विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले. नगर तालुका पोलिस ठाण्यात आणल्यावर चौकशीत त्यांनी, दुसऱ्याच्या ओळखपत्रावर (डमी) परीक्षेला बसल्याची कबुली दिली. ज्या विद्यार्थ्यांसाठी हे "डमी' विद्यार्थी परीक्षा देत होते, त्यांचाही या गुन्ह्यात आरोपी म्हणून समावेश केला आहे. 

टंकलेखनाची परीक्षाही स्वतः देता येत नाही. विद्यार्थीच नव्हे तर महापालिकेच्या एका आयुक्तांनी परीक्षेला डमी बसविण्याचा प्रकार केला होता. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com