दुशेरे गावाला पुराच्या पाण्याचा वेढा; संपर्क तुटला

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 ऑगस्ट 2019

- गावाला पुराच्या पाण्याने वेढा घातला आहे. गावात प्रवेश करण्यासाठी ओढ्यावर एकच पूल आहे. त्यावरून बाहेर येणारा मार्ग आहे.

- तो पूल पाण्याखाली गेल्यामुळे गावचा संपर्क तुटला आहे. त्यामुळे गावातील सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत.

दुशेरे : गावाला पुराच्या पाण्याने वेढा घातला आहे. गावात प्रवेश करण्यासाठी ओढ्यावर एकच पूल आहे. त्यावरून बाहेर येणारा मार्ग आहे. तो पूल पाण्याखाली गेल्यामुळे गावचा संपर्क तुटला आहे. त्यामुळे गावातील सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. काल संध्याकाळपर्यंत ओढ्यावरील पुलावर पाणी नव्हते. मात्र रात्री पूल पाण्याखाली गेला. आज सकाळी पूल पाण्याखाली गेल्यानंतर गावात घबराट निर्माण झाली. प्रशासनाने सतर्कता बाळगली आहे. धोकादायक स्थितीतील कुटुंबे स्थलांतरीत केली जात आहेत. 

आज या गावाचा संपर्क तुटल्यानंतर जिल्हा परिषद शाळा बंद ठेवली आहे. तर गावातून बाहेर येण्यास मार्ग नसल्याने कराड आणि इतरत्र ठिकाणी नोकरीस जाणाऱ्या लोकांनी सुट्टी घेतली आहे. त्याचबरोबर शेतीसह दैनंदिन कामकाज पूर्णतः बंद आहे. गावालगतच्या म्हसोबा मळा, चैनी मळा येथे स्थलांतरीत होणाऱ्या कुटुंबांना नावेच्या सहाय्याने बाहेर काढले जात आहे.

नितीन जाधव म्हणाले, आमच्या गावाला बाहेर पडण्याचा एकच मार्ग आहे. तो मार्ग बंद असल्याने गावातून कोणीही बाहेर पडलेले नाही. गावाला पुराच्या पाण्याचा वेढा पडल्याने गावचा संपर्क तुटला आहे. मी कराडच्या कृष्णा रुग्णालयात नोकरीस आहे. माझ्याबरोबर अनेक लोकं नोकरीस गेलेली नाहीत. दरम्यान परिसरातील खुबी, गोंदी, रेठरे खुर्द, शेरे, कोडोली, कार्वे येथील नदीकाठी राहती घरे, जनावरांची शेड पाण्याखाली गेल्यामुळे फार मोठे नुकसान झाले आहे. या गावामधील अनेक कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dushera village lost connection as surrounded by flood waters