दसरा, दिवाळीमुळे "अर्थ'गाडा हालला; जीएसटी वसुलीत वाढ

 Dussehra, Diwali moves 'Earth' cart; GST collection increases
Dussehra, Diwali moves 'Earth' cart; GST collection increases

सांगली : कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर ठप्प असलेले अर्थचक्र दसरा, दिवाळीमुळे हळूहळू गतिमान होऊ लागले आहे. जिल्ह्याच्या जीएसटी संकलनात मागील चार महिने वाढ होत आहे. गतवर्षीच्या ऑक्‍टोबर महिन्यातील कर वसुलीच्या तुलनेत यंदाच्या ऑक्‍टोबर महिन्यात 10.76 टक्के जादा कर वसुली झाली आहे. 

कोरोनामुळे एप्रिल ते मे अशी तीन महिने लॉकडाऊनच्या काळात जीएसटी कर वसुली ठप्प होती. त्यामुळे गेल्या सात महिन्यांच्या कर वसुलीचा आकडा गतवर्षीच्या तुलनेत 13.56 टक्के कमी आहे. मात्र जूनपासून सुरू झालेली करवसुली वाढत असून, केवळ ऑक्‍टोबर महिन्याचा विचार केल्यास गतवर्षीच्या तुलनेत यंदा 10.76 टक्के जादा करवसुली झाली आहे.

ऑक्‍टोबर 2019 मध्ये जीएसटी वसुली 62.72 कोटी रुपये होती; तर यंदा ऑक्‍टोबर महिन्यात हाच आकडा 70.29 कोटी रुपये इतका झाला आहे. जीएसटी महसुलात सुमारे 7.57 कोटींनी वाढ झाली आहे. कोरोनानंतर अर्थव्यवस्था रुळावर कधी येणार असा प्रश्‍न उपस्थित होत असताना ही कर वसुली सुचिन्ह दर्शवत आहे. 

एकूण वसुलीत अद्याप घटच 
केवळ ऑक्‍टोबरच्या तुलनेत वाढ दिसत असली तरी यंदा एप्रिल ते ऑक्‍टोबर या सात महिन्यांमध्ये जीएसटीचा महसूल हा गतवर्षीच्या याच काळाच्या वसुलीच्या तुलनेत 64.72 कोटीने कमी आहे. जिल्ह्यात एप्रिल 19 ते ऑक्‍टोबर 19 या काळात 477.26 कोटी इतका महसूल जमा झाला होता. यंदा याच कालावधीत 412.54 कोटी इतका महसूल जमा झाला आहे. यातील तीन महिने तर लॉकडाऊनमध्येच गेले होते. त्यामुळे चालू वर्षीच्या सात महिन्यांत 13.5 टक्के इतका कमी महसूल जमा झाला आहे. 

कोरोनाचा फटका 
कोरोनाचा देशात प्रसार होत असताना सरकारने मार्चमध्ये देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा केली. प्रवास, उद्योगधंद्यांवर निर्बंध लादले. याचा थेट परिणाम अर्थव्यवस्थेवर झाला. उद्योगधंदेच ठप्प झाल्याने शासनाला मिळणाऱ्या महसुलात मोठी घट झाली. त्यामुळे राज्यांना मिळणारा जीएसटीतही घट झाली. 

जिल्ह्यात 25,179 करदाते 
जिल्ह्यात 25,179 करदाते आहेत. मात्र तरी विवरणपत्र भरणाऱ्यांचे प्रमाण 50 ते 55 टक्के इतकेच आहे. त्यामुळे सहापेक्षा जास्त विवरण पत्रे न सादर केलेल्या हजारो करदात्यांची नोंदणी रद्द झाली आहे. त्यांना ई वे बिल तयार करता येत नसल्याने बऱ्याच जणांनी थकीत कर व विवरण पत्रे भरली. ज्यांची नोंदणी रद्द झाली आहे अशांना त्यांच्या ग्राहकाला कर देयक देणे अशक्‍य झाल्याने ग्राहकांना अशा व्यवहारांवर तत्काळ आय.टी.सी. घेता येत नाही व रोख कर भरणा करावा लागतो. 

अर्थव्यवस्था लवकर पूर्वपदावर येऊ शकेल
कोरोनाच्या लॉकडाऊननंतर उद्योग व बाजारपेठा सुरू झाल्या असून दसरा, दिवाळीमुळे अर्थकारण गतिमान होऊ लागले आहे. त्यामुळे बाजारपेठेला ऊर्जितावस्था आली आहे. उद्योगांना चांगल्या ऑर्डर मिळू लागल्या आहेत. त्यामुळे कर वसुलीतही सकारात्मक परिणाम दिसू लागला आहे. हाच ट्रेंड राहिला तर अर्थव्यवस्था लवकर पूर्वपदावर येऊ शकेल. 
- राजेंद्र मेढेकर, वरिष्ठ निरीक्षक, केंद्रीय जीएसटी 

संपादन :  युवराज यादव

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com