सलाम... आधी कर्तव्य, मोबदला नंतर... 

Before duty, after compensation...
Before duty, after compensation...

शिराळा : कोरोनाने जगभर थैमान घातले असल्याने उदरनिर्वाहासाठी परगावी गेलेले लोक आपल्या मूळ गावी येऊ लागले आहेत. आशा गावी येणाऱ्या प्रत्येकाची घराघरात जाऊन नोंद करण्याचे काम महाराष्ट्रातील मानधनधारक 70 हजार आशा व 4 हजार गटप्रवर्तक महिलांना करत आहेत. जीवावर उदार होऊन या राष्टीय आपत्तीत त्या आपले काम किती मोबदला मिळणार याचा विचार न करता करत आहेत.

मात्र त्यांना त्यांच्या या कामाचा मोबदला किती मिळणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे. पैशांपेक्षा आपल्या लोकांचा जीव महत्त्वाचा आहे, असे म्हणून या 74 हजार रणरागिणी कोरोनाविरोधी जैविक युद्धात प्रत्येक गावात आपले कर्तव्य बजावत आहेत. त्यामुळे संपूर्ण गावच बनले आशांचे कुटुंब अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आधी कर्तव्य मग मोबदला या भूमिकेतून आशांनी काम सुरू केले आहे. 

प्रत्येक गावात एक हजार लोकवस्तीसाठी एक आशा अशी नियुक्ती ही गावातील एक महिलेची केली आहे. तिची नियुक्ती मानधनावर असून कामाप्रमाणे तिला भत्ता दिला जातो. आरोग्य विभागाचा कोणताही सर्व्हे आला, की पहिली आठवण आशांची होते. प्रत्येक सर्व्हेत आशांच्या समावेश असतो. त्याचे मानधन ही ठरलेले असते, पण आजच्या घटकेला कोरोनाबाबतचा सर्व्हे गावनिहाय आशांना दिला आहे. बाहेरून गावात किती लोक आले, त्याच्या घरोघरी जाऊन नोंदी घेण्यास सांगितले आहे. दररोजची फिरती सक्तीची आहे, पण त्याचा मोबदला किती हे अद्याप शासनाने जाहीर केलेले नाही. मात्र आपल्या लोकांच्या जीव पेक्षा पैसा महत्त्वाचा नाही, हे गृहीत धरून त्यांनी कामाला सुरुवात केली आहे.

गावनिहाय बाहेरून आलेल्या लोकांच्या याद्या तयार करणे, आजारी असतील तर त्यांना जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेणे, कोरोनाबाबतची जनजगृती करणे ही कामे अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडत आहेत. आशा या गाव आणि प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्यातील दुवा म्हणून काम करत आहेत. आपल्या कुटुंबाची जबादारी सांभाळून त्यांना गावात फिरती करावी लागत आहे. त्यामुळे आपले गाव हेच माझे कुटुंब म्हणून काम करावे लागत असून आशा ते कर्तव्य अत्यंत प्रामाणिक पणे पार पाडत आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com