गाळ्यांच्या ई-लिलावाची अद्याप टांगती तलवार कायम 

Solapur Municipal Corporation
Solapur Municipal Corporation

सोलापूर : नागपूरच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार मुख्यमंत्र्यांच्या आदेशाबाबत कोणतेही अधिकृत आदेश, पत्र किंवा सूचना न मिळाल्याने ई-लिलावाची प्रक्रिया राबविण्याबाबतचे काम सुरूच राहील, असे आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी सांगितले. जसा आदेश येईल, तसा निर्णय घेण्यात येईल, असेही ते म्हणाले. 

महापालिकेच्या ई-निविदा प्रक्रियेला गाळेधारक व व्यापाऱ्यांनी विरोध केला. दरम्यान, सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या पुढाकाराने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी नागपूर येथे चर्चा होऊन या प्रक्रियेला स्थगिती आदेश मिळवल्याची माहिती देण्यात आली. मात्र, या संदर्भातील कोणतेही आदेश महापालिकेच्या प्रशासनाला शासनाकडून अद्यापही प्राप्त झाले नसल्याचे सांगत आयुक्तांनी आपली प्रक्रिया शासन आदेश येईपर्यंत सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट केले. 

गाळेधारक गाळ्यांची मुदत त्यांचे भाडे व त्या संदर्भातील विस्तृत माहिती महापालिकेच्या वेबसाइटवर झळकणार आहे. यापूर्वीही महापालिकेच्या गाळ्यांचा लिलावाचा ठराव आला होता. मात्र, त्याला स्थगिती मिळाली होती अशाच स्थगितीचे तोंडी आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेले असले तरी त्यांनी प्रत्यक्ष शासनाकडून कोणतेही आदेश महापालिकेला न पाठविल्याने महापालिका प्रशासनासह गाळेधारकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. 

स्थायी समितीच्या ठरावानुसार अनेक गाळे 
महापालिकेच्या स्थायी समितीच्या केवळ ठरावाच्या आधारावर महापालिकेचे अनेक गाळे देण्यात आले आहे. काही गाळे तर करार अथवा कोणतेही कागदपत्रे नसताना गाळेधारकांना देण्यात आले आहेत, अशी काही खळबळजनक माहिती पुढे आली आहे. अशी सर्व प्रकरणे शोधण्याचे काम सुरू आहे, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com