मोहोळ तालुक्यात पंचवीस महा ई-सेवा केंद्र मंजूर

राजकुमार शहा
गुरुवार, 5 जुलै 2018

सध्या शाळा व महाविद्यालयांची प्रवेश प्रक्रीया सुरु आहे. त्यासाठी वेगवेगळे दाखले जात प्रमाणपत्र व अन्य कागदपत्रासाठी तालुक्यातील बहुतांश नागरिकांना मोहोळ येथील सेतु कार्यालयात यावे लागते. त्यासाठी त्यांचा वेळ व पैसा मोठया प्रमाणात खर्च होतो. तसेच एका हेलपाट्यात काम झाले, तर ठिक अन्यथा पुन्हा हेलपाटे मारावे लागतात.

मोहोळ : मोहोळ तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरीकांच्या सोईसाठी पंचवीस महा ई-सेवा केंद्र मंजुर झाली असल्याची माहिती तहसीलदार किशोर बडवे यांनी दिली.

सध्या शाळा व महाविद्यालयांची प्रवेश प्रक्रीया सुरु आहे. त्यासाठी वेगवेगळे दाखले जात प्रमाणपत्र व अन्य कागदपत्रासाठी तालुक्यातील बहुतांश नागरिकांना मोहोळ येथील सेतु कार्यालयात यावे लागते. त्यासाठी त्यांचा वेळ व पैसा मोठया प्रमाणात खर्च होतो. तसेच एका हेलपाट्यात काम झाले, तर ठिक अन्यथा पुन्हा हेलपाटे मारावे लागतात. तसेच ज्याच्या घरात कोणी सुशिक्षित नाही, अशा शेतकरी कुटुंबाची मोठी अडचण होते. 

मंजुर झालेली ही महा ई-सेवा केद्र लवकर सुरू झाली, तर नागरीकांची कामे लवकर व वेळेत होणार आहेत. तालुक्यातील आणखी तेहतीस ठिकाणे रिक्त आहेत. त्या ठिकाणी मागणी नाही. प्रत्येक पाच हजार लोकसंख्या असणाऱ्या गावासाठी ही केंद्रे मंजुर झाली आहेत. यामुळे सध्या कार्यरत असलेल्या मोहोळ येथील सेतुवरील ताण कमी होणार आहे. 

गावनिहाय मंजुर महा ई सेवा केंद्र पुढील प्रमाणे 
आष्टी कामती बु॥ मोहोळ  कुरणवाडी (आ)  कुरुल खंडोबाची वाडी खुनेश्वर गोटेवाडी  घाटणे  देगाव परमेश्वर पिंपरी बिटले घोडेश्वर भांबेवाडी मसले चौधरी  यावली  लमाण तांडा   वाढेगाव  वरकुटे  वाघोली  विरवडे बु॥  सय्यद वरवडे  सारोळे पोफळी हराळवाडी इत्यादी

Web Title: e seva center in mohol

टॅग्स