सोलापुरात झळकले आता असेही फ्लेक्स

अशोक मुरूमकर
Friday, 13 December 2019

स्मार्ट सिटी म्हणून नावारूपास येत असलेल्या या शहरात स्वच्छतागृहांचा प्रश्‍न गंभीर आहे. त्यामुळे महत्त्वाच्या ठिकाणी स्मार्ट सिटीच्या कामांतर्गत ‘ई-टॉयलेट’ उभारण्यात आले आहेत. हिरव्या आणि पांढऱ्या रंगाच्या अतिशय सुसज्ज असलेल्या या टॉयलेटकडे पाहिल्यानंतर ग्रामीण भागासह शहरातीलही अनेक नागरिकांना हे काही तरी वेगळेच असल्याचा समज होतो.

सोलापूर : मध्य रेल्वेच्या मार्गावरील प्रमुख स्थानक असलेले सोलापूर शहर हे चादरीसाठी प्रसिद्ध आहे. या शहरात मराठीसह तेलुगु, कन्नड व हिंदी भाषा प्रामुख्याने बोलल्या जातात. त्यामुळे बहुभाषिक जिल्हा म्हणूनही या शहराकडे पाहिले जाते. कर्नाटक व आंध्र प्रदेश या राज्यांच्या सीमेवर हा जिल्हा आहे. सोलापूरची कडक भाकरी आणि शेंगा चटणी ही देशभर प्रसिद्ध आहे. 

Image may contain: one or more people

हेही वाचा : पाच वर्षांचा मुलगा आमटीच्या भांड्यात पडला अन्‌...
काही पूर्णत्वास गेली आहेत

२०१४ मध्ये देशात भाजपचे सरकार आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्त्वाकांक्षी संकल्पना म्हणून पाहिल्या जाणाऱ्या ‘स्मार्ट सिटी’ या योजनेत देशातील इतर शहरांच्या यादीत सोलापूरचे नाव झळकले. आणि त्याची अनेक कामेही सध्या सुरू आहेत. काही पूर्णत्वास गेली आहेत. अशाच एका कामाचे पोस्टर सध्या सोलापुरात झळकत आहे. ते सर्वांचेच लक्ष वेधत आहे.

No photo description available.

सोलापूर जिल्ह्यात करमाळा, माढा, बार्शी, अक्कलकोट, माळशिरस, पंढरपूर, सांगोला, मोहोळ, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर व मंगळवेढा हे ११ तालुके आहेत. यातील प्रत्येक तालुक्याची वेगवेगळी ओळख आहे. 

हेही वाचा : ‘तो’ पाठवायचा महिला, तरुणींचे फोटो, मग झाले असे...
जिल्ह्यातील वेगळेणे...

सांगोला, मंगळवेढा व पंढरपूर या भागात डाळिंब, द्राक्ष व काही ठिकाणी बोरच्या बागा जास्त आहेत. करमाळा तालुक्यात उजनी पट्ट्यात केळीचे पीक सध्या वाढत आहे. पावसाच्या लहरीपणामुळे या जिल्ह्याकडे  दुष्काळी म्हणून पाहिले जात आहे. मात्र जिल्ह्याला वरदायिनी ठरलेले उजनी धरण पुणे जिल्ह्यात पडणाऱ्या पावसामुळे १०० टक्के भरते. यामुळे यावर अवलंबून असलेल्या भागाला वर्षभर पाणी पुरते. या जिल्ह्यात ज्वारीची पेरणी मोठ्या प्रमाणात होते. उसाचे क्षेत्रही मोठे असल्यामुळे साखर कारखानदारी मोठ्या प्रमाणात आहे. प्रत्येक तालुक्याचे वेगळेपण या जिल्ह्यात आहे. प्रशासकीय कामांसाठी तालुक्यातून नागरिकांना सोलापूर शहरात यावे लागते. 

No photo description available.

हेही वाचा : ‘यांच्या’मुळेच घडली ही रत्ने
स्वच्छतागृहाचा प्रश्‍न गंभीर

शहरात झोपडपट्टी भाग मोठ्या प्रमाणात आहे. विडी कामगार येथे मोठ्या प्रमाणात आहेत. शहरातील पूर्व भाग, जुळे सोलापूर, मध्यवर्ती भाग अशा प्रत्येक भागातील नागरिकांचे वेगळेपण आहे. काही ठिकाणी सुशिक्षितांचे प्रमाण जात आहे. तर काही ठिकाणी याचे प्रमाण कमी आहे. 

No photo description available.

स्मार्ट सिटी म्हणून नावारूपास येत असलेल्या या शहरात स्वच्छतागृहांचा प्रश्‍न गंभीर आहे. त्यामुळे महत्त्वाच्या ठिकाणी स्मार्ट सिटीच्या कामांतर्गत ‘ई-टॉयलेट’ उभारण्यात आले आहेत. हिरव्या आणि पांढऱ्या रंगाच्या अतिशय सुसज्ज असलेल्या या टॉयलेटकडे पाहिल्यानंतर ग्रामीण भागासह शहरातीलही अनेक नागरिकांना हे काही तरी वेगळेच असल्याचा समज होतो. त्यामुळे अनेक नागरिक ई-टॉयलेटचा वापर करत नाहीत, हे आम्ही पाहतो, असे रोहन परदेशी या तरुणाने सांगितले. 

 

No photo description available.

हेही वाचा : दहावीचे विद्यार्थी, पालकहो तुमच्यासाठी...
‘सकाळ’चा पाठपुरावा...

या स्वच्छतागृहाचा वापर कसा करायचा, याची माहितीच नसल्याने आणि कार्पोरेट कार्यालयांप्रमाणे दिसणारे हे ई-टॉयलेट फक्त नावाला उरले असल्याचे वृत्त ‘सकाळ’ने काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध केले होते. पत्रकार प्रशांत देशपांडे यांनी ते दिले होते. पत्रकार सुस्मिता वडतिले यांनी तर याचे ऑन द स्पॉट रिपोर्टिंग करून त्याचे वास्तव पुढे आणले होते. त्यात काही ठिकाणी दरवाजा उघडत नसल्याचे, काही ठिकाणी सॅनिटरी नॅपकिन येत नसल्याचे समोर आले होते. याबरोबरच याचा वापर कसा करावा याची माहिती हवी, अशी नागरिकांची मागणी असल्याने मोठे फलक लावावेत, अशी नागरिकांची मागणी ‘सकाळ’ने लावून धरली होती. आता ई-टॉयलेटच्या बाजूला नागरिकांना सहज समजेल अशा पद्धतीने फ्लेक्स झळकले आहेत.

No photo description available.

असा करा ई-टॉयलेटचा वापर
१) आपण शौचालयाजवळ गेल्यानंतर शौचालय आपल्याला आवाजाच्या स्वरूपात सूचना देईल.
२) शौचालयात प्रवेश करण्यासाठी कोणतेही नाणे (रुपये १, २, ५, १०) वापरू शकता. परंतु शिल्लक रक्कम परत येणार नाही.
३) नाणे टाकल्यानंतर आपल्याला दरवाजा उघडण्यास सांगण्यात येईल. किंवा नाणे परत येईल.
४) आत दुसरा वापरकर्ता असल्यास किंवा वीज, पाणी नसल्यास नाणे परत येईल.
५) नाणे स्वीकारल्यास १५ सेकंदाच्या आत दरवाजा ढकलून उघडावा.
६) दरवाजा उघडल्यानंतर शौचालयाचे भांडे स्वच्छ होईल.
७) शौचालयाच्या आत आरसा, दिवा व पंखा आहे.

No photo description available.

८) आत हात धुण्याकरिता सेन्सर असलेला नळ आहे.
९) बटण दाबून शौचालय स्वच्छ करू शकता.
१०) शौचालयात कोणीही नसताना वारंवार स्वच्छ केले जाईल.
११) हे शौचालय स्वच्छ करण्यासाठी व हात धुण्यासाठी कमीत कमी पाण्याचा वापर केला जातो. 
१२) हे शौचालय स्वच्छ राखण्यासाठी प्रेशर जेटिंग सिस्टीमचा वापर केला जातो.
१३) हे शौचालय कमीतकमी ऊर्जेचा वापर करते.
१४) हे शौचालय स्वच्छ आणि आरोग्यदायक आहे. 
१५) आतून बंद केल्यानंतर बाहेरून कोणालाही प्रवेश करता येत नाही.
१६) बाहेर पडण्यासाठी दरवाजाचे हॅन्डेल वळवू शकता. महाराष्ट्र


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: E-Toilet flakes highlighted in Solapur