लहान मुलींची कर्णफुले लंपास करणारा अल्पवयीन ताब्यात

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 13 मे 2018

कोयना वसाहत परिसरातील घराबाहेर खेळणाऱ्या मुलीच्या कानातील सोन्याची कर्णफुले लंपास करणाऱ्या अल्पवयीन संशयितास पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून तीन गुन्हे उघडकीस आले आहेत. या मुलीसह अऩ्य एका लहान मुलीचे कर्णफुलेही त्याने लंपास केली.

कऱ्हाड : कोयना वसाहत परिसरातील घराबाहेर खेळणाऱ्या मुलीच्या कानातील सोन्याची कर्णफुले लंपास करणाऱ्या अल्पवयीन संशयितास पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून तीन गुन्हे उघडकीस आले आहेत. या मुलीसह अऩ्य एका लहान मुलीचे कर्णफुलेही त्याने लंपास केली. तर एका ज्येष्ठ नागरिकाच्या हातातील अंगठीही त्याने लंपास केल्याचे उघड झाले आहे. अंगठीसह कर्णफुले असा सुमारे दीड तोळ्याचा ऐवज पोलिसांनी संबधित संशयिताकडून जप्त केला. संबधित संशयित सतरा वर्षांचा असल्याने त्याला बाल न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

पोलिसांना सांगितले की, कोयना वसाहत येथील पाच मंदीर परिसरात घराच्या परिसरात खेळणाऱ्या लहान मुलीच्या कानातील सोन्याची फुले ओरबडून चोरट्यांनी लंपास केली. पोलिसात त्याची तक्रार दाखल होती. कोयना वसाहत व पाच मंदीर परिसरात सुमारे पाच दिवसापूर्वी ही घटना घडली होती. त्यालाच लागून असलेल्या भागातही खेळणाऱ्या लहान मुलींच्या कानातील कर्णफुले लंपास होती.

एकाच दिवशी दोन चोऱ्या झाल्याची माहिती पोलिसात दाखल होता. पोलिसही चक्रावून गेले होते. मात्र येथील गुन्हे प्रकटीकरण विभागाचे सहायक पोलिस निरिक्षक हनुमंत गायकवाड व त्यांच्या पथकाने सलग तीन दिवस सलग तपास केला. त्यामुळे प्रकरणाचा पोलिसांनी छडा लावण्यात त्यांना यश आले आहे. त्या प्रकरणात सतरा वर्षाच्या अल्पवयीन युवकास पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याने तीन चोऱ्यांची कबुली दिली असून त्या चोऱ्यातील ऐवजही पोलिसांनी जप्त केला आहे. त्याने चोरीची कबुली देत दोन मुलींची व एका ज्येष्ठ नागरिकाची अंगठी चोरल्याचेही पोलिसांना सांगितले. 

अंगठीसह सुमारे दीड तोळ्यांचे दागिने पोलिसांनी जप्त केले आहे. लहान मुलींना चॉकलेट देण्याच्या बहाण्याने त्याने जवळ बोलावून हिसडा देऊन कर्णफुले लंपास केल्याचे पोलिसांना सांगितले आहे. ज्येष्ठ व्यक्तीस मलकापूरच्या भाजी मंडई परिसरात त्याने लुबाडले. तेथेही हातचलाखीने त्यांची अंगठी काढून घेतली. त्याबाबतची नोंदही पोलिसांनी घेतली आहे. 

Web Title: Ear Ring Theft Minor In possession with Police