कोयना धरण परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के

विजय लाड
गुरुवार, 1 ऑगस्ट 2019

कोयना धरण परिसर भूकंपाच्या सौम्य धक्क्याने हादरला. मागील सात दिवसांपासून मुसळधार पावसाने गारठून गेलेला कोयनेचा परिसरात आज (गुरुवार) रात्री 9.07 वाजता 3.1 रिश्टर स्केल क्षमतेच्या भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले.

कोयनानगर : कोयना धरण परिसर भूकंपाच्या सौम्य धक्क्याने हादरला. मागील सात दिवसांपासून मुसळधार पावसाने गारठून गेलेला कोयनेचा परिसरात आज (गुरुवार) रात्री 9.07 वाजता 3.1 रिश्टर स्केल क्षमतेच्या भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले.

भूकंपाच्या धक्क्याचे अंतर कोयना धरणापासून 20 किमी आहे. या धक्क्याने पाटण तालुक्यात कोणत्याही ठिकाणी जीवित अथवा वित्तहानी झाली नाही. याबाबतची माहिती पाटण तहसीलदार रामहरी भोसले यांनी दिली. तर कोयना धरणाला या भूकंपाचे धक्के जाणवले नसल्याचे कार्यकारी अभियंता कुमार पाटील यांनी स्पष्ट केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Earth Quakes in the Koyna Dam area