संगमनेर तालुक्यात भुकंपाचे सौम्य धक्के

आनंद गायकवाड
रविवार, 26 ऑगस्ट 2018

संगमनेर तालुक्याच्या पठार भागाची भौगोलिक रचना पाहता हा भुभाग डहाणू ते गुजरात या भूपृष्ठ भ्रंश रेषा (फॉल्ट लाईन) वर असल्याने, या ठिकाणी भुकंपाचे सौम्य धक्के बसत आहेत. मात्र चार रिश्टर स्केलपेक्षा अधीक तीव्रतेचा धक्का असल्यास जीवीतहानीची शक्यता असल्याने, या धक्क्यांमुळे ग्रामस्थांनी घाबरुन जाऊ नये असे प्रतिपादन नाशिक येथील मेरी (महाराष्ट्र इंजिनीअरींग रिसर्च इन्स्टिट्यूट) या संस्थेच्या वरीष्ठ भू-वैज्ञानिक चारुलता चौधरी यांनी केले. आज मेरी संस्थेसह महसुल व भुजल सर्वेक्षण, आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या अधिकाऱ्यांनी या परिसरात केलेल्या पाहणी दौऱ्यानंतर त्या गारगाव येथील बैठकीत ग्रामस्थांना मार्गदर्शन करीत होत्या.

आश्वी(नगर)- संगमनेर तालुक्याच्या पठार भागाची भौगोलिक रचना पाहता हा भुभाग डहाणू ते गुजरात या भूपृष्ठ भ्रंश रेषा (फॉल्ट लाईन) वर असल्याने, या ठिकाणी भुकंपाचे सौम्य धक्के बसत आहेत. मात्र चार रिश्टर स्केलपेक्षा अधीक तीव्रतेचा धक्का असल्यास जीवीतहानीची शक्यता असल्याने, या धक्क्यांमुळे ग्रामस्थांनी घाबरुन जाऊ नये असे प्रतिपादन नाशिक येथील मेरी (महाराष्ट्र इंजिनीअरींग रिसर्च इन्स्टिट्यूट) या संस्थेच्या वरीष्ठ भू-वैज्ञानिक चारुलता चौधरी यांनी केले. आज मेरी संस्थेसह महसुल व भुजल सर्वेक्षण, आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या अधिकाऱ्यांनी या परिसरात केलेल्या पाहणी दौऱ्यानंतर त्या गारगाव येथील बैठकीत ग्रामस्थांना मार्गदर्शन करीत होत्या.

मागील काही वर्षात व या वर्षी गेल्या आठवड्यापासून जाणवत असलेल्या भुकंपाच्या धक्क्यांमागील शास्त्रीय कारण सांगतांना त्यांनी, या परिसराचे भौगोलिक स्थान, व त्यामुळे होत असलेला परिणाम स्पष्ट करुन, यामागे कदाचित या परिसरात गेल्या काही वर्षात पाण्यासाठी खोलवर घेतलेल्या विंधन विहीरी (बोअरवेल) मुळे भुगर्भात निर्माण झालेल्या एअर बबल मुळेही सौम्य धक्के बसत असल्याचा अंदाज व्यक्त केला. हे धक्के हानीकारक नसल्याने नागरिकांनी घाबरु नये असे आवाहन या संस्थेने केले आहे. 

गेल्या काही दिवसात या परिसरातील विविध सोशल माध्यमातून वेगाने पसरत असलेले अफवांचे पीक व त्यामुळे वाढलेली दहशत या पार्श्वभुमिवर मंगळवार ऐवजी आजच मेरी संस्थेच्या तज्ज्ञांसह, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे विरेंद्र बडदे, कैलास गिराम (मेरी), अजिंक्य काटकर (भुजल सर्वेक्षण), तहसिलदार साहेबराव सोनवणे यांच्या पथकाने बोटा येथे पहाणी केली तर घारगावमध्ये ग्रामस्थांची बैठक आयोजित करुन, त्यांचे प्रबोधन केले.

या वेळी पोलिस निरीक्षक अंबादास भुसारे, जनार्दन आहेर, संदेश गाडेकर (सरपंच, तांगडी), वैशाली डोके (सरपंच, खंदरमाळवाडी), तलाठी साईनाथ ढवळे, सुरेश आहेर, जगदिश आहेर, किशोर डोके, नितीन आहेर, मंडलाधिकारी के. आर. लोहरे, ग्रामसेवक पी. बी. गंभीरे आदींसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: earthquake in Sangamner taluka