कोयना धरण परिसरात भूकंपाचा सोम्य धक्का 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 5 February 2020

सातारा जिल्ह्यातील कोयना धरण परिसर आज (बुधवार) सायंकाळी सहा वाजून ५० मिनिटानी भूकंपाच्या सौम्य धक्कयाने हादरला आहे. 

कोयनानगर (जि. सातारा) :  सातारा जिल्ह्यातील कोयना धरण परिसर आज (बुधवार) सायंकाळी सहा वाजून ५० मिनिटानी भूकंपाच्या सौम्य धक्कयाने हादरला आहे. 

कोयना धरण परिसरात २.७ रिश्टर स्केल क्षमतेचा भुकंपाचा धक्का बसला आहे. सातारा जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापनाने दिलेल्या माहितीनुसार भूकंपमापन केंद्रावर या भूकंपाच्या धक्कयाची तीव्रता २.७ रिश्टर स्केल एवढी नोंद झाली आहे. 

हे पण वाच -  आता बस्स... हिंगणघाट घटनेवरून संभाजीराजे संतापले 

भूकंपाच्या धक्क्याचा केंद्रबिंदू कोयना धरणापासून १३.६ किलोमीटर पुढे वारणा खोऱ्यात होता.
 या भुकंपाच्या धक्क्याने कोणत्याही प्रकारची वित्त अथवा जीवित हानी झाली नसल्याचे कोयना प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता कुमार पाटील यांनी सांगितले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Earthquake strikes in Koyna Dam area