साखरेच्या उत्पादनाला यंदा ग्रहण !

eclipse to Sugar income to this year!
eclipse to Sugar income to this year!

नगर : शिवाराने गेल्या वर्षी दुष्काळ सोसला. त्याची झळ ऊसउत्पादनालाही बसली. मागील वर्षी उसाचे एक लाख 20 हेक्‍टर क्षेत्र यंदा तब्बल पन्नास हजार हेक्‍टरने घटले. त्याचप्रमाणे साखरेचे उत्पादनही मागील वर्षीच्या तुलनेत एक कोटी 48 लाख 36 हजार 525 क्विंटलवरून यंदा 70 लाख क्विंटलने घटणार असल्याचा अंदाज प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयाकडून वर्तविण्यात आला आहे. एके काळी जिल्ह्यात साखरेचा गाळप हंगाम सहा ते सात महिने चालत होता. आर्थिक उलाढालीचा केंद्रबिंदू असणाऱ्या साखर कारखान्यांचा हंगाम आता फक्त अडीच महिन्यांवर येऊन ठेपला आहे. त्यात साखर उत्पादन 78 लाख 36 हजार 525 क्विंटल घटण्याच्या शक्‍यतेने शेतशिवाराच्या अर्थचक्राचा मुख्य आधार असलेल्या कारखान्यांना यंदा ग्रहण लागल्याचे संकेत आहेत. 

गेल्या वर्षी जिल्ह्यात एक लाख 20 हजार हेक्‍टर क्षेत्रावर उसाचे फड होते. आजमितीला फक्त 70 हजार हेक्‍टर क्षेत्रावरच ऊस आहे. गाळपासाठी 16 साखर कारखान्यांचे प्रस्ताव प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयाला प्राप्त झाले होते. त्यांपैकी 14 कारखान्यांना गाळपाचे परवाने देण्यात आले. यंदा साखर कारखान्यांतून 65 लाख टन उसाचे गाळप होणार आहे. 

शेतीतील उत्पन्नावर शेतकऱ्यांचे वर्षभराचे अर्थचक्र अवलंबून असते. भंडारदरा, मुळा, निळवंडे, आढळा, जायकवाडी, कुकडी यांसारख्या प्रकल्पांमुळे जिल्ह्यातील मोठे क्षेत्र सिंचनाखाली आले. त्यातूनच ऊसशेतीकडे शेतकऱ्यांचा ओढा वाढला. जिल्ह्यात सरासरी सव्वा लाख हेक्‍टर क्षेत्र उसाखाली असते. मात्र, गेल्या वर्षीच्या दुष्काळामुळे उसाचे क्षेत्र घटले आहे. या वर्षी जिल्ह्यात 70 हजार हेक्‍टरवर उसाचा फड उभा आहे. दर वर्षी साधारणपणे दसरा झाला, की साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू होतो.

यंदा मात्र खूप उशीर झाला. जिल्ह्यातील 23 साखर कारखान्यांपैकी 14 कारखान्यांना गाळप परवाने देण्यात आले आहेत. अगस्ती, भाऊसाहेब थोरात, गंगामाई, संत ज्ञानेश्‍वर, वृद्धेश्‍वर, श्री क्रांती, अंबालिका या कारखान्यांची धुराडी पेटली आहेत. 

बंद साखर कारखाने 
बाबूराव तनपुरे (राहुरी) 
प्रसाद (राहुरी) 
गणेश (राहाता) 
पीयूष (नगर) 
जय श्रीराम (जामखेड) 
साईकृपा (हिरडगाव, श्रीगोंदे) 
शिवाजीराव नागवडे (श्रीगोंदे) 

गाळपाचे परवाने मिळालेले कारखाने 
अशोक (श्रीरामपूर) 
अगस्ती (अकोले) 
भाऊसाहेब थोरात (संगमनेर) 
प्रवरा (राहाता) 
संजीवनी (कोपरगाव) 
कोपरगाव (कोपरगाव) 
गंगामाई (शेवगाव) 
केदारेश्‍वर (शेवगाव) 
संत ज्ञानेश्‍वर (नेवासे) 
मुळा (नेवासे) 
वृद्धेश्वर (पाथर्डी) 
श्री क्रांती (पारनेर) 
अंबालिका (कर्जत) 
युटेक (संगमनेर) 

"यांना' परवाने देण्याची प्रक्रिया सुरू 
कुकडी सहकारी साखर कारखाना 
साईकृपा (देवदैठण) साखर कारखाना 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com