‘अर्थ’च्या कारवाईचा भोपळा फुटेना

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 डिसेंबर 2016

सांगली - झेडपीच्या स्वीय निधी खर्चाबाबत नेहमीच अर्थ समितीच्या बैठकीत ‘चाय पे चर्चा’ या म्हणीचा प्रत्यय वारंवार येतोय. नेहमीच खर्च करा अन्यथा कारवाईच्या चर्चेला ‘अर्थ’ नसल्याचे पुन्हा पुन्हा स्पष्ट होत आहे. गेल्या आठ महिन्यांत केवळ २५ टक्के निधी खर्च झाला. ऐन निवडणुकीच्या तोंडावरही निधी खर्चण्यात पदाधिकारी, खातेप्रमुख अपयशी ठरलेत.

उपाध्यक्ष रणजित पाटील यांच्या अध्यक्षतेखाली अर्थ समितीची बैठक झाली. गेल्या तीन महिन्यांपासून स्वीय निधी खर्चाबाबत नेहमीच तीच ती चर्चा होताना दिसते आहे. तारीख व रक्कमांतील किरकोळ फारफेर बदलून तेच ते मुद्दे इतिवृत्तांत नेहमी दिसतात. विभागाचे अधिकारी, पदाधिकाऱ्यांचे अपयश लपून राहिले नाही. स्वीय निधीच्या ५४. ६८ कोटींतील १३. २६ कोटीच खर्च झाले आहेत.  

अर्थ समितीच्या बैठकीत चर्चा, ठराव आणि निर्णयाची अंमलबजावणी मात्र शून्य अशी विचित्र स्थिती गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. विभागाच्या अधिकाऱ्यांना कामात गुंतवण्यात पदाधिकाऱ्यांचा कच्चा अभ्यासही कारणीभूत ठरतो आहे. आमचे जे काही सुरू आहे ते नियमाप्रमाणेच अशा भास अधिकारी पदाधिकाऱ्यांना सांगून थांपा मारतात. त्यांना पदाधिकारी, सदस्य बळी पडत असल्याचे चित्र आहे. 

समाजकल्याणमधील १.०१ कोटीची वसंत घरकुल मंजुरीच्या अडचणीमुळे त्याच विभागावर खर्च न होता. त्यातील ५१ लाख रुपये स्वीयकडे जमा झालेत. कृषी विभागाकडून चाफकटर खरेदीसाठी २५ लाख जादा निधीची मागणी केली आहे. ती गैर आहे. त्याबद्दल सभेत नाराजी व्यक्त झाली. महिला व बालकल्याणकडील हेड बदलून ६० लाख खर्च होत आहेत. अपंग कल्याणचे फक्त २२ टक्केच खर्च झाला. झेरॉक्‍स, तीन चाकी सायकल आणि श्रवणयंत्रांची खरेदी रखडली आहे. 

Web Title: economic committee crime