जीएसटीचा निर्णय अर्थक्रांती करणारा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 एप्रिल 2017

सांगली - सर्व वस्तूंवर केंद्रीय व राज्याचा कर वेगळा आकारला जातो. त्यामुळे व्यापारीवर्ग कराखाली दबला आहे. प्रत्येक वस्तूवर एक समान कर असावा यासाठी जीएसटी लागू करण्याचा निर्णय योग्य आहे.  हा अर्थक्रांती करणारा निर्णय आहे, असे मत  अर्थशास्त्राचे अभ्यासक ॲड. दीपक गोडसे यांनी केले. पश्‍चिम महाराष्ट्र कर सल्लागार संघटनेतर्फे आयोजित डेक्कन मॅन्युफॅक्‍चरर्स असोसिएशन सभागृहात  ‘जीएसटी’ एकदिवीसीय चर्चासत्रात ते बोलत होते. यावेळी कोल्हापूरचे विक्रीकर सहआयुक्त विलास इंदलकर, सांगलीचे अतिरिक्त आयुक्त सुरेंद्रकुमार मानकोसकर व सहायक आयुक्त अश्‍विनकुमार उके उपस्थित होते. त्यांनी उद्‌घाटन केले. 

श्री. गोडसे म्हणाले,‘‘एक देश एक कर हे तत्त्व  महत्त्वाचे आहे. जीएसटी कर लागू करणे म्हणजे देशाचे एक पाऊल अर्थक्रांतीकडे चालले आहे. त्यामुळे सर्व किमतीवर नियंत्रण ठेवता येईल. प्रत्येक नागरिकाला रिटर्नमध्ये आपली मालमता भरून देणे जबाबदारीचे  आहे. तसेच कर भरणे गरजेचे आहे. असे न केल्यास दुहेरी कर भरावा लागणार आहे. त्यामुळे ग्राहकांना नियोजन करण्याची चांगली सवय लागेल. देशाला महासत्ता होण्यासाठी हा कर अमलात येणे गरजेचे आहे.’’

श्री. मानकोसकर म्हणाले,‘‘जीएसटीमुळे एक देश, एक कर आणि एक बाजारपेठ ही संकल्पना नावारूपास येणार आहे. त्यामुळे या कर प्रणालीचा व्यावसायिकांबरोबरच ग्राहकांनाही फायदा होणार आहे.’’ या वेळी ॲड. विद्याधर आपटे व नरेंद्र सोनवणे उपस्थित होते. टी. बी. लुल्ला चॅरिटेबल फाऊंडेशनने संयोजन केले. अमित लुल्ला यांनी आभार मानले.

Web Title: Economist of GST decision