देशाची अर्थव्यवस्था संकटात ः शरद पवार 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 फेब्रुवारी 2020


सांगली ः देशाची अर्थव्यवस्था संकटात असताना सत्ताधारी नेतृत्वाकडून त्यात दुरुस्तीची शक्‍यताही धूसर दिसत आहे. दोनच नेते देश चालवतात, असे वातावरण आहे, असा हल्लाबोल राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांचा नामोल्लेख करण्याचे मात्र त्यांनी टाळले. 

सांगली ः देशाची अर्थव्यवस्था संकटात असताना सत्ताधारी नेतृत्वाकडून त्यात दुरुस्तीची शक्‍यताही धूसर दिसत आहे. दोनच नेते देश चालवतात, असे वातावरण आहे, असा हल्लाबोल राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांचा नामोल्लेख करण्याचे मात्र त्यांनी टाळले. 

खानापूर विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार सदाशिव पाटील यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात आज प्रवेश केला. भोकरे अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेशाचा कार्यक्रम झाला. त्यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील, खासदार श्रीनिवास पाटील प्रमुख उपस्थित होते. 

दरम्यान, पत्रकार परिषदेत शरद पवार म्हणाले,"" देशाची अर्थव्यवस्था सध्या गंभीर वळणार आहे. धोक्‍यांच्या परस्थितीत ती दुरुस्त करावी, अशी इच्छाशक्तीच सत्ताधारी नेत्यांची दिसत नाही. याचे परिणाम देशात गेल्या दोन वर्षापासून दिसताहेत. येत्या काही वर्षात अर्थव्यवस्था आणखी गंभीर परस्थिती धारण करणार आहे. ही परस्थिती लक्षात घेवूनच रिझर्व्ह बॅंकेतील अधिकारीही बाहेर पडू लागले आहेत. त्याला सर्वस्वी सत्ताधाऱ्यांतील दोन लोकच कारणीभूत आहेत. त्यांची देशात मोठी दहशत आहे. देशाच्या संसदेतील भाजपचे खासदारही त्यांच्या विरोधात प्रतिक्रीया व्यक्त करताना आजूबाजूला कोण आहे. का याची खास्त्री करुन मते व्यक्त करतात. हे मला संसद परिसरात फिरताना जाणवले आहे.' 

दिल्ली विधानसभा निकालाच्या पार्श्‍वभूमिवर श्री. पवार म्हणाले,"" देशातील जनता भाजपला दूर राहण्याचा मानसिक स्थितीत आहेत. लोकांना बदल हवा आहे. दिल्लीत ते पुन्हा एकदा सिध्द झालेले आहे. देशाची सुत्रेही बिगर भाजपासाठी येवू शकतात. मात्र नुकत्याच निवडणूका झाल्या आहेत. यापुढे देशात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मात्र हे चित्र पहायला मिळू शकते. त्यासाठी अन्य पक्षांनी भाजपला सक्षम पर्याय देण्याची जबाबदारी सर्वांचीच आहे.' 
एनआरसीबाबत शरद पवार म्हणाले," देशभर एनआरसीला विरोध सुरु आहे. विशेष म्हणजे सरकारने याबाबींवर कोणाशी चर्चाच केली नाही. एका विशिष्ट समाजावर आरोप करुन त्यांच्यावरच टार्गेट करणे चुकीचे आहे." 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Economy of the country in crisis: Sharad Pawar