उच्च शिक्षण घेऊनही नशिबी ‘चौंडकं’च

संदीप खांडेकर
रविवार, 3 जून 2018

कोल्हापूर - बीटेक, हॉटेल मॅनेजमेंट, बीएस्सी, लॉ असे शिक्षण घेऊनही जोगत्यांची नोकरीअभावी परवड होत आहे. त्यांच्या जगण्याचा आधार सुती आणि चौंडकंच आहे. जोगत्यांनी उपेक्षा मागे टाकून संघर्ष सुरूच ठेवला आहे.

कोल्हापूर - बीटेक, हॉटेल मॅनेजमेंट, बीएस्सी, लॉ असे शिक्षण घेऊनही जोगत्यांची नोकरीअभावी परवड होत आहे. त्यांच्या जगण्याचा आधार सुती आणि चौंडकंच आहे. जोगत्यांनी उपेक्षा मागे टाकून संघर्ष सुरूच ठेवला आहे.

हातात तुणतुणं व चौडकं घेऊन रेणुका मंदिरात त्यांचा दिवस जात असला तरी त्यांच्या शिक्षणाचा प्रवास थक्क करणारा आहे. आकाश तिवले बीटेक झालेला आहे. शुभमचे शिक्षण बीएस्सी भाग-२ पर्यंतचे. प्रकाश बारावी सायन्स, सुनील बारावी कॉमर्स, तर अमृत व युवराज दहावीपर्यंत शिकलेले.

देवीची सेवा करत या सर्वांची नोकरी करण्याची यांची प्रबळ इच्छा आहे. 
शुभम एकनाथ कुंभार येथील महावीर महाविद्यालयातून बीएस्सी भाग-दोनपर्यंत शिकला. विद्यापीठ हायस्कूलचा विद्यार्थी. त्याने दहावीला ८२, तर बारावीला ७८ टक्के गुण मिळविले. त्याच्या आईचे २०१६ ला निधन झाले.

मदनआई शांताबाई जाधव यांनी त्याच्या शिक्षणाचा खर्च केला. त्याने आधारकार्डसाठी वर्षापूर्वी अर्ज केला. अद्याप त्याला आधारकार्ड मिळालेले नाही.
आकाश सदाशिव तिवले बीटेकपर्यंत शिकला आहे. दहावीला ६१.३८ व बारावीला ६६.२२ टक्के गुण मिळविणारा. गेली तीन वर्षे सौंदत्तीवर वास्तव्यास आहे.

प्रकाश निंगाप्पा गजबर विज्ञान शाखेतून बारावीपर्यंत शिकला. विशेष म्हणजे त्याने हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्सही पूर्ण केला आहे. सुनील मेढे याने बारावी वाणिज्य शाखेतून ७२ टक्के मिळविले आहेत. तो २००१ पासून रेणुका मंदिरात देवीच्या सेवेत आहे. अमृत यशवंत सुतार व युवराज आवळकर दहावीपर्यंत शिकले. युवराज विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून बालगुन्हेगारांचे समुपदेशन करतात. याचबरोबर एकजण कायद्याची पदवीही घेत आहेत.

अर्ज चारवेळा रिजेक्‍ट
मदनआई शांताबाई जाधव यांनी आधारकार्डसाठी केलेला अर्ज चारवेळा ‘रिजेक्‍ट’ झाला आहे. त्यांच्याकडे पंधरा ते सोळा शिष्य आहेत. मदनआईंना आधारकार्ड कधी मिळणार, अशी विचारणा ते करत आहेत.

रेशनकार्ड, आधारकार्ड, बॅंक अकाउंट मिळण्यात अडचणी का, हा माझ्यासमोर प्रश्‍न आहे. ते शासनाने आम्हाला द्यावे, हीच आमची इच्छा आहे.
- आकाश तिवले

Web Title: educated third gender life