Bhagavad Gita : कर्नाटकात विद्यार्थ्यांना भगवद्गीतेचे धडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

education Bhagavad Gita lessons for students in Karnataka belgaum

Bhagavad Gita : कर्नाटकात विद्यार्थ्यांना भगवद्गीतेचे धडे

बेळगाव : कर्नाटकमध्ये शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना भगवद्गीतेचे धडे दिले जाणार आहेत. नैतिक शिक्षणाच्या अंतर्गत गीतेचा अभ्यासक्रमात समावेश असणार आहे. हा अभ्यासक्रम डिसेंबरपासून सुरु होईल, अशी माहिती विधानसभेत देण्यात आली.
बंगळूर येथे विधिमंडळ अधिवेशन सुरु असून आमदार एम. के. प्राणेश यांनी हा मुद्दा उपस्थित केला. याबाबत प्राथमिक व माध्यमिक शिक्षणमंत्री बी. सी. नागेश यांनी उत्तर दिले. अध्यापन विषयावर अनेकदा चर्चा झाली असून शासनातर्फे समिती स्थापण्यात येईल, अशी घोषणा त्यांनी केली. आता नैतिक शिक्षणाचा भाग म्हणून भगवद्गीतेचे धडे देण्यात येतील.

सांस्कृतिक मूल्ये लोप पावत असून त्यासाठी प्राथमिक, माध्यमिक आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना नैतिक शिक्षणाचा भाग म्हणून गीता शिकविण्याचा निर्धार भाजप सरकारकडून करण्यात आला आहे. मागील काही वर्षांपासून भाजपशासित राज्यात गीतेवर आधारित शिक्षणाबाबत चर्चा केली जात आहे. यामध्ये गुजरात राज्य आघाडीवर आहे. आता कर्नाटक राज्यातर्फेही प्रस्ताव आणण्यात आला आहे. नैतिक शिक्षण म्हणून गीतेचा समावेश अभ्यासक्रमात होईल. त्याचे स्वरूप, कोणत्या वर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षण देणार, किती भागांत देणार आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्याबाबत शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येणार आहे, अशी माहिती शिक्षण खात्याकडून देण्यात येत आहे.

विरोधी पक्षांचा आक्षेप
भाजप सरकारच्या निर्णयाचे काहींनी स्वागत केले आहे. तर विरोधी पक्षांनी त्यावर आक्षेप घेतला आहे. धर्मनिरपेक्ष जनता दलाने गीता शिकून पोट भरणार नाही, अशी टीका केली आहे. तर विधानसभेतील विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी शिक्षणाचा दर्जा चांगला हवा, अशी सावध प्रतिक्रिया दिली आहे. माजी मंत्री तन्वीर शेठ यांनी अभ्यासक्रमात गीतेचा विषय समाविष्ट करून जातीय मतभेद वाढविले जाणार आहेत. राज्य सरकारकडून राजकीय लाभ घेण्याची तयारी सुरु आहे, असा आरोप केला.

Web Title: Education Bhagavad Gita Lessons For Students In Karnataka Belgaum

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..